सेवानिवृत्त हवाई दलातील अधिकारी तथा संस्थेचे ज्येष्ठ संचालक वसंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. याची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. ल.जि. उगांवकर, सचिव गोपाळ पाटील, सहसंचालक ॲड. अंजली पाटील, संचालक अनिल भंडारी, अजय ब्रह्मेचा, छाया निखाडे, अधिक्षिका ॲड. मुग्धा सापटणेकर, माध्यमिक-उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गिते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विद्या अहिरे, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका पूनम सोनवणे तसेच सर्व विभागाचे शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक बाळासाहेब रणशूर यांनी केले.
डे-केअर शाळेत ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST