शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

सुविधांसाठी संघर्ष पाचवीला पूजलेला

By admin | Updated: November 16, 2016 01:46 IST

कोकणीपुरा, बागवानपुरा : ‘दुबई वॉर्ड’ विकासापासून वंचित

अझहर शेख नाशिकजुन्या नाशकातील सध्याच्या ‘दुबई वॉर्ड’ची व्याप्ती वाढली आहे. मुस्लीमबहुल प्रभाग म्हणून ओळख असलेल्या दुबई वॉर्डला जोडल्या गेलेल्या नवीन भागामुळे प्रभागाची ओळख काही प्रमाणात बदलणार आहे. १९९२ पासून या प्रभागातील जनतेने कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन पक्षांवर विश्वास दाखविला. प्रभागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळी झाला नाही. येथील नागरिकांना गावठाण भाग म्हणून सोयीसुविधांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागत आला आहे. सध्याचा प्रभाग २६ मधील परिसराचा गेल्या पाच वर्षांमध्ये कायापालट झाला; मात्र प्रभाग २८ चा परिसर जो नव्याने प्रभाग १४ मध्ये समाविष्ट झाला आहे त्या परिसरात अजूनही सोयीसुविधांची वानवा जाणवते. प्रभाग २८ मधून अपक्ष उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले आहे तर प्रभाग ३९ चा काही भाग सध्याच्या प्रभाग १४ मध्ये समाविष्ट असून. या भागात मनसेचे उमेदवार निवडून आले आहे तर प्रभाग २९ मधील काही भागही या प्रभागाला जोडला गेला असून, सध्या प्रभाग २९ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे.एकूणच प्रभाग क्रमांक १४ मध्ये सध्याचा संपूर्ण प्रभाग २६, प्रभाग २८, प्रभाग ३९, प्रभाग २९ च्या परिसराची भर पडली आहे. त्यामुळे ‘दुबई वॉर्ड’मध्ये यंदा मोठ्या प्रमाणात चुरस रंगणार आहे. प्रभागासाठी आरक्षण अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला व सर्वसाधारणच्या दोन जागा असल्यामुळे उड्या पडणार आहेत. प्रभागाचा राजकीय इतिहास बघितला असता कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे; मात्र या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान प्रभागाची व्याप्ती लक्षात घेता यंदा या प्रभागातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. येथील आरक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. यामुळे भाऊगर्दी होणार आहे. राजकीय पार्श्वभूमी९९२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून शेख नसीर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. १९९७ साली महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसवर लोकांनी विश्वास दाखविला आणि सिराज जीन हे निवडून आले. त्यानंतर २००२ साली कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मैनुद्दीन कोकणी व रेश्मा मुल्ला हे दोन्ही उमेदवार निवडून आले, तर बिलाल खतीब हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. २००७ साली झालेल्या निवडणुकीत निजाम कोकणी निवडून आले. २०१२ साली पुन्हा राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे दोन उमेदवार जनतेने निवडून दिले. यामध्ये कॉँग्रेसच्या समिना मेमन, राष्ट्रवादीचे सुफीयान जीन यांच्याकडे प्रतिनिधित्व आले. संपूर्ण राज्यासह शहरातही मनसेची लाट असताना ‘दुबई वॉर्ड’ अपवाद ठरला व मनसेच्या उमेदवार लता कमोद यांचा दारुण पराभव झाला. प्रभाग २८मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर संजय साबळे तर शबाना पठाण या अपक्ष म्हणून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्या. प्रभागाचा कौल बघता यावेळी निवडणुकीच्या दृष्टीने पठाण यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.