शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर भरतीसाठी पाच हजार युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:33 IST

लष्कर भरतीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मध्यरात्रीपासूनच प्रक्रिया सुरू केल्याने गोंधळ टळण्यास मदत झाली.

देवळाली कॅम्प : लष्कर भरतीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मध्यरात्रीपासूनच प्रक्रिया सुरू केल्याने गोंधळ टळण्यास मदत झाली.  भरतीच्या पहिल्या दिवशी रविवारी नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात युवक आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परिणामी जळगाव व धुळे जिल्ह्यातील युवकांची भरती मंगळवारी पहाटे तीन वाजेपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नाशिक जिल्हातील युवकांकरिता भरतीप्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी सोमवारी रात्री बारा वाजेपासूनच आनंदरोड मैदानावर युवकांनी गर्दी केली होती. गोंधळ उडू नये म्हणून लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया सुरू करत शारीरिक चाचणी पहाटे तीनपासून सुरू करण्यात आली. पहाटे ५ वाजेच्या सुमारास येथील आनंदरोड मैदानावर विविध तालुकावार विभागणी करत युवकांना आत सोडण्यात आले. अगोदर धुळे व जळगाव जिल्हातील उर्वरित उमेदवारांना संधी देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्हाभरातील उमेदवारांना सोडण्यात आले. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेस सुरुवात करून मैदानी चाचणी व उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासणी करण्यात आली. यात फिट बसलेल्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी थांबविण्यात आले तर अनफिट झालेल्यांना तत्काळ बाहेर काढून देण्यात आले. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील युवकांची भरतीसाठी गर्दी कमी दिसून आली. त्यामुळे सकाळी अकरापर्यंत आनंदरोड मैदान, सह्याद्रीनगर मैदान रिकामे झाले होते.खाकीतील माणुसकीमुख्य भरतीप्रक्रिया मैदानापासून बाहेर पडणाºया उमेदवारांची सोय व्हावी या हेतूने आयुक्तालय व देवळाली कॅम्प पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने माणुसकीच्या भावनेतून भरतीतून बाद होणाºया उमेदवारांना खंडेराव टेकडी ते नाशिकरोडपर्यंत सोडण्यासाठी दोन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.युवकांचा जन्म दाखला, शैक्षणिक दाखला व कागदपत्रे, क्रीडा, रहिवासी दाखला, विवाहित अथवा अविवाहित असल्याचा पुरावा, ६ महिन्यांपर्यंतचा चारित्र्य दाखला, जातीचा दाखले, प्रतिज्ञापत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र यांसह सर्व शैक्षणिक पात्रता असलेले मार्कशीट, शाळा व महाविद्यालयीन काळामधील खेळात मिळवलेली प्रमाणपत्रे, सर्व मूळ प्रमाणपत्रे आदींसह सेवारत, माजी सैनिक, शहीद जवान व वीरपत्नी यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानEmployeeकर्मचारीNashikनाशिक