शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार वन दावे स्वाक्षरीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:10 IST

भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहंकार कसा दुखावतो याचा अनुभव सध्या स्वाक्षरीविना पडून असलेले जिल्ह्यातील वन हक्काचे दावे घेत आहेत.

नाशिक : भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहंकार कसा दुखावतो याचा अनुभव सध्या स्वाक्षरीविना पडून असलेले जिल्ह्यातील वन हक्काचे दावे घेत आहेत. अधिकाºयांच्या या सुंदोपसुंदीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून वन हक्क दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थापित जिल्हास्तरीय समितीची एकही बैठक होऊ शकलेली नाही.केंद्र सरकारने केलेल्या वन हक्क कायद्याला आठ वर्षांचा कालावधी उलटला असून, वन खात्याच्या ताब्यातील जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाºया आदिवासीला त्या जमिनीचा ताबा देणाºया या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर वन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांत वन जमिनींचा ताबा असलेल्या आदिवासींकडून पुरावे व कागदपत्रांची तपासणी करून दावे मंजूर करण्याचे काम केले जात असून, तालुका पातळीवर प्रांत अधिकारी तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या आदेशान्वये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त आदिवासी आयुक्त,तर सदस्य म्हणून उप वन संरक्षक अधिकाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात गेल्या चार वर्षांपासून तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या उदासीनतेमुळे वन हक्क कायद्याचे काम रखडले असून, ते असेच आणखी काही वर्षे चालावे असे अधिकाºयांना वाटत असावे म्हणून की काय जिल्हाधिकाºयांनी या जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे अध्यक्षपदाचे आपले अधिकार अपर जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केले, परिणामी अपर जिल्हाधिकाºयांना जिल्हाधिकाºयांना अधिकार जरी प्रदान झाले असले तरी, अतिरिक्त आदिवासी आयुक्तव उप वन संरक्षक या दोघा समिती सदस्यांचा हुद्दा अपर जिल्हाधिकाºयांपेक्षाही वरचा आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी या दोन्ही अधिकाºयांना कोणत्याही सूचना वा आदेश देऊ शकत नाही हे वास्तव कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी स्वीकारले नाही. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारीपदी बसलेली व्यक्ती उप वन संरक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या वयाच्या तुलनेने अगदीच कमी असल्यामुळेही जिल्ह्णात वन हक्काचे दावे मंजूर करण्यासाठी उप वन संरक्षकांना आदेशित करण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाच हजार दावे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून फक्त मंजुरीसाठी अधिकाºयांच्या स्वाक्षरीसाठी पडून आहेत.