शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 09:35 IST

मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे.

नाशिकमध्ये कांदा निर्यात बंदी व कांद्याचे पडलेले दर लोकसभा निवडणुकीचे वातावरण फिरवण्याची शक्यता आहे. हे दोन कळीचे मुद्दे महायुतीची डोकेदुखी वाढवत असताना आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. या सभेला शेतकरी आणि संघटना आंदेलन करण्याची शक्यता असल्याने तसेच सभेत गोंधळ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा लोकांवर लक्ष ठेवला आहे. यातूनच आज ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवले आहे. 

मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे. या शेतकऱ्यांचे एकरी तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी  लोकमतने दिले होते. कांदा प्रश्नावरून काही शेतकऱ्यांनी मोदींना सभेवेळी जाब विचारणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठाकरे गटाच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

गेल्या दहा वर्षांत मोदींनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याचा आरोप करत आजच्या सभेत त्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा या शिवसैनिकांनी दिला होता. यामुळे या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

याचबरोबर मोदींच्या सभेत कांदा उत्पादकांचे आंदोलन होण्याच्या शक्यतेने कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या अनेकांना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnashik-pcनाशिकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे