शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अवघ्या साडेतीन किलोमीटर अंंतरात पाच सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:19 IST

नाशिक : अशोकस्तंभ ते जेहान सर्कल अंतर किती? अवघे तीन ते साडेतीन किलोमीटर! मात्र आता हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच सिग्नल पार करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एका ठिकाणी तर अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर दोन सिग्नल असल्याने आता घाईच्या वेळी गंगापूररोडवरून जावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण ...

नाशिक : अशोकस्तंभ ते जेहान सर्कल अंतर किती? अवघे तीन ते साडेतीन किलोमीटर! मात्र आता हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच सिग्नल पार करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एका ठिकाणी तर अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर दोन सिग्नल असल्याने आता घाईच्या वेळी गंगापूररोडवरून जावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहराची वाहतूक समस्या एका वेगळ्या वळणावर जात असून, त्यासाठी करीत असलेली कृती मात्र जणू अगतिक असल्याचे दिसत आहे. त्यामागे नागरिकांच्या सोयीचा विचार असला तरी अवघ्या तीन किलोमीटर अंतरात पाच सिग्नल असतील तर सोय आहे की गैरसोय, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक सुधारणांचा धडाका सुरू झाला आहे. त्यात यंत्रणेच्या नियोजनाचा भाग अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी जेहान सर्कल येथे दोन अपघातात दोन महिलांचा बळी गेला होता. त्यावेळी हा चौक धोकादायक असल्याची नागरिकांची तक्रार होती आणि त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी तत्परतेने या चौकात सिग्नल लावण्याचे आश्वासन दिले तसेच ते पूर्णही केले. परंतु आता याचवेळी या मार्गावर पाच सिग्नल करण्याचे सूतोवाच यंत्रणेने केले आणि त्याबरहुकूम कार्यवाही होत आहे. जेहान सर्कल आणि तेथून अशोकस्तंभ दरम्यान जुना गंगापूर नाका येथे एक सिग्नल अगोदरच कार्यान्वित झाला आहे. परंतु आता प्रसाद सर्कल त्यापुढे थत्तेनगर येथे सर्कल होणार आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. याच मार्गावर पुढे पंडित कॉलनीतून बाहेर पडणाºया म्हणजेच रावसाहेब थोरात सभागृहाजवळील चौकात अगोदरच सिग्नल मंजूर करण्यात आले आहे. महापालिकेत या सिग्नलवरून सेना-भाजपाच्या दोन नगरसेवकांमध्ये झालेला वादही त्यावेळी गाजला होता. आता तीन किलोमीटरमध्ये पाच सिग्नल आणि त्यातील दोन म्हणजेच थत्तेनगर ते प्रसाद सर्कल अगदी दोन अडीचशे मीटर अंतरावरच सिग्नल आहे. पोलीस आणि महापालिका सिग्नलचे टायमिंग सिंक्रोनाइज करणार असली म्हणजेच एक सिग्नल सुटला की वाहनचालकाला सर्व सिग्नल रांगेत मिळतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. परंतु गर्दीच्या वेळी जेहान सर्कलकडे जाणारी वाहतूक प्रसाद सर्कलजवळ अडकली आणि त्याचवेळी थत्तेनगर येथून सिग्नल सुटला तर येथे वाहनांच्या किती रांगा लागतील हा प्रश्न आहे. केवळ गंगापूररोडवरच असा प्रकार आहे अशातला भाग नाही तर कॉलेजरोडवरदेखील बिग बाजार मॉलजवळील चौक आणि त्याच्या पुढे लगेच हॉलमॉर्क चौकात सिग्नल असणार आहे.मुळात हॉलमार्क चौक हा काय प्रकार? असा प्रश्न पोलिसांच्या प्रगटनानंतर अनेकांना पडला. प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक हीच ती जागा आहे. परंतु पोलीस यंत्रणेनेच जाहीर केलेले चौक गोंधळात टाकणारे आहे. असाच प्रकार त्र्यंबकरोडच्या बाबतीत होणार आहे. मायको सर्कल हटवून त्या जागी सिग्नल बसविण्यात येणार आहे. त्याच्याच पुढे ग्रीन व्ह्यू हॉटेलसमोरील चौकात सिग्नल आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गांवर वाहन चालविताना थांबत थांबत जावे लागणार आहे.