शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

पाच पिस्तुले;२२ जिवंत काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:35 IST

काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून सापळे रचले. वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.

सिडको / नाशिकरोड : काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून सापळे रचले. वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.  शहरातील अंबड व नाशिकरोड परिसरात दोघा संशयितांकडून प्रत्येकी तीन व दोन असे एकूण पाच पिस्तुलांसह २२ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पिस्तूल विक्री करणाऱ्या एका इसमास अटक केली. त्याच्याकडून एक लाख नऊ हजार २५० रुपये किमतीचे तीन गावठी पिस्तुलांसह ११ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे शोध पथकाला संबंधित चुंचाळे शिवारास सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. यावेळी एका एक्सयूव्ही मोटार संशयास्पदरीत्या पथकाला आढळली. पोलिसांनी मोटारीला घेरले. पोलिसांनी मोटारीमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलेला मनोज मच्छिंद्र शार्दुल (२५,रा.चुंचाळे) याची कसून चौकशी करत अंगझडती घेतली.सत्कारपॉइंट येते आवळल्या मुसक्यादुसºया घटनेत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक संजय गामणे यांनी सत्कारपॉइंट नाशिकरोड येथे सापळा रचला. एक व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना माहिती दिली. उपनिरीक्षक भीमराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी सापळा रचला. संशयित इसम संग्राम बिंदुमाधव फडके (३९, रा.गंधर्वनगरी) हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. फडके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता दोन पिस्तूल पोलिसांना आढळले. तसेच त्याच्याकडून ११ जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे