शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पाच नवनिर्वाचित चढले पहिल्यांदाच विधानसभेची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 01:00 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करत निवडून आलेल्या जिल्ह्यातील पाच नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी (दि.२७) पद व गोपनीयतेची शपथ घेत पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढली. या पाच पैकी नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार राहुल ढिकले वगळता अन्य चार आमदार सरोज अहिरे, नितीन पवार, सुहास कांदे आणि हिरामण खोसकर हे सत्ताधार बाकावर दिसणार आहेत.

ठळक मुद्देशपथविधी : ढिकलेवगळता अन्य चार आमदार सत्ताधारी बाकावर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करत निवडून आलेल्या जिल्ह्यातील पाच नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी (दि.२७) पद व गोपनीयतेची शपथ घेत पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढली. या पाच पैकी नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार राहुल ढिकले वगळता अन्य चार आमदार सरोज अहिरे, नितीन पवार, सुहास कांदे आणि हिरामण खोसकर हे सत्ताधार बाकावर दिसणार आहेत.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला लागल्यानंतर गेल्या महिनाभरापासून राजकीय नाट्य रंगले होते. या राजकीय घडामोडींमुळे विधानसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांचा शपथविधी लांबला होता. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर जिल्ह्यातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.अखेर राजकीय रंगमंचावर सत्तानाट्याची तिसरी घंटा वाजली आणि राजकीय अनिश्चिततेवर पडदा पडत बुधवारी अखेर सर्व निर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. १५ पैकी ५ आमदार विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. या आमदारांनी बुधवारी पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढत सभागृहाची नवलाई अनुभवली. जिल्ह्यातून देवळाली मतदारसंघातून राष्टÑवादीच्या सरोज अहिरे यांनी तीन दशकांपासून असलेली घोलप कुटुंबीयांची सद्दी संपुष्टात आणत इतिहास घडविला आहे. सरोज अहिरे या महापालिकेत भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु, जागा वाटपात देवळालीची जागा सेनेलाच सोडण्यात आल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत ऐनवेळी राष्टÑवादीचे बोट धरले आणि त्यांनी आमदार योगेश घोलप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. नाशिक पूर्व मतदारसंघातही मनसेतून भाजपत दाखल झालेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी आमदार बाळासाहेब सानप यांचा पराभव करत पहिल्यांदाच विधानसभा गाठली.सानप यांचे भाजपने ऐनवेळी तिकीट कापल्याने ढिकले यांनी भाजपचे कमळ हाती घेत विजय संपादन केला. कळवण मतदारसंघात माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दीर्घकाळ आमदारकी उपभोगणारे माकपचे जे. पी. गावित यांचा पराभव करीत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला तर नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास कांदे हे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व दोन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे पंकज भुजबळ यांचा पराभव करत जायंट किलर ठरले.इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेकडून उमेदवारी करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसची वाट धरलेल्या हिरामण खोसकर यांनी पराभवकेला. त्यामुळे गावित यांची विधानसभेत जाण्याची हॅट्ट्रीक हुकली. विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या या पाचही सदस्यांनी मातब्बरांना पराभवाची धूळ चारली. आता महाविकास आघाडी सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याने या पाचपैकी भाजपचे राहुल ढिकले वगळता राष्टÑवादीच्या सरोज अहिरे व नितीन पवार, शिवसेनेचे सुहास कांदे व कॉँग्रेसचे हिरामण खोसकर हे सत्ताधारी बाकावर दिसणार आहेत.अन्य सदस्यांचा शपथविधीजिल्ह्यातील राष्टÑवादीचे हेवीवेट नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे माजी मंत्री दादा भुसे हे सलग चौथ्यांचा विधानसभेवर निवडून गेले आहेत. याशिवाय, सिन्नरमधून राष्टÑवादीचे माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीतून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ हे तिसऱ्यांदा तर निफाडचे राष्टÑवादीचे दिलीप बनकर, चांदवडचे भाजपचे डॉ. राहुल अहेर, बागलाणचे भाजपचे दिलीप बोरसे, मालेगाव मध्यचे एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोह्मम्मद, नाशिक पश्चिमच्या भाजपच्या सीमा हिरे आणि नाशिक मध्यच्या भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे हे सदस्य दुसºयांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. या आमदारांनीही बुधवारी पदाची शपथ घेतली. यामधील छगन भुजबळ आणि दादा भुसे यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित मानले जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMLAआमदार