शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:21 IST

महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जात असली तरी खुनाच्या घटना रोखण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.

ठळक मुद्देधक्कादायक : कायदासुव्यवस्था धोक्यात; व्यावसायिकासह एक तरुणी, तीन तरुणांची हत्या

नाशिक : महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जात असली तरी खुनाच्या घटना रोखण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.नवे वर्ष उजाडले आणि आठवडा उलटत नाही तोच नाशिककरांच्या कानी इंदिरानगर भागात व्यावसायिकाच्या खुनाची घटना आली. ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या या परिसरात सहा लाखांची रोकड लुटून नेत एका मॉलच्या मालकाची संशयितांनी निर्घृण हत्या केल्याची गंभीर घटना घडली. पोलीस यंत्रणाही या घटनेनी तितकीच हादरली आणि तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, पंचवटी पोलीस ठाण्यांकडून या खुनाचा समांतर तपासाला गती दिली गेली. तपासाची चक्रे फिरत नाही तोच दुसऱ्या दिवशी दि. ९ जानेवारीला कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रू परिसरातील एका व्यावसायिक संकुलाच्या टेरेसवर तरुणीचा मृतदेह गंगापूर पोलिसांना आढळून आला. १८ ते २० वयोगटांतील या तरुणीची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे तपासात उघड झाले. त्याच्या मुसक्या पंचवटी पोलिसांकडून आवळल्या गेल्या. या घटनेला चार दिवस पूर्ण होत नाही, तर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंजमाळ भागात क्षुल्लक कारणावरून टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवून युवकाला मकरसंक्रांतीच्या रात्री ठार मारले.आत्येबहिणीच्या हळदीला आला असता तेथे टोळक्याचे भांडण सुरू असल्याचे लक्षात आल्याने भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती केली म्हणून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागात टोळक्याने युवकाची धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना रविवार, दि. २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. . या गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोच पुन्हा आठवडाभराने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी सिडकोमधील गजबजलेल्या चौकात उभ्या असलेल्या एका युवकाला दोघांनी दुचाकीवरून येत भोसकल्याची घटना शुक्रवारी (दि.८) घडली.खूनसत्र सुरूच, पोलीस हतबल; गुन्हेगारी टोळ्याही अस्तित्वातशहरात महिनाभरात पाच खून झाले असून, जणू नव्या वर्षासोबत शहरात खूनसत्रास आरंभ झाला की काय? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. लागोपाठ शहरात खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे नाशिककर चांगलेच धास्तावले आहेत. सातत्याने घडणाºया खुनाच्या घटना रोखण्याचे पोलीस आयुक्तालयापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.४शहरात केवळ खून सत्र सुरु आहे असे नव्हे तर भर रस्त्यात खुलेआम टोळीयुद्ध भडकल्याचे दिसते. गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यात आल्याचे पोलीस सांगत असले तरी शहरातील अनेक भागात भाईगिरी करणाºया टवाळ्यांच्या टोळ््या स्थापन झाल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMurderखून