शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

पाच नगराध्यक्ष बिनविरोध

By admin | Updated: November 24, 2015 23:15 IST

औपचारिक घोषणा सोमवारी : शेलार, अहेर, लहरे, सातपुते, पगार पहिले नगराध्यक्ष

नाशिक : जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकेकच अर्ज आल्याने या पाचही ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. ३०) नोव्हेंबरला होणार आहे.निफाड नगरपंचायतीसाठी भाजपाचे राजाराम शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे. त्याचप्रमाणे देवळा नगरपंचायतीसाठी शहर विकास आघाडीच्या; परंतु भाजपा सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. (पान ९ वर)तसेच सुरगाणा नगरपंचायतीसाठी भाजपाच्याच रंजना लहरे, कळवण नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुनीता कौतिक पगार, तर पेठ नगरपंचायतीसाठी शिवसेनेच्या लता भूपेंद्र सातपुते यांचाही एकमेव अर्ज आल्याने सुरगाणा, कळवण व पेठ नगरपंचायतीसाठी अनुक्रमे रंजना लहरे, सुनीता पगार व लता सातपुते यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड मानली जात आहे. चांदवड पंचायत समितीसाठी मात्र माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असल्याने येथील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. चांदवड नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे भूषण कासलीवाल यांच्यासह नवनाथ अहेर व देवीदास (राजू) शेलार यांचेही उमेदवारी अर्ज आल्याने येथील निवडणूक ३० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. माघारीसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत कालावधी असून, या काळात जर कोेणी माघार घेतलीच तर चांदवड नगराध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अन्यथा येथे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी किंवा कॉँग्रेस अशी काट्याची लढत पहावयास मिळू शकते.(प्रतिनिधी)