शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाशिकसह राज्यात पाच डिफेन्स झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:27 IST

सातपूर : शासनाच्या धोरणानुसार राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स झोन प्रस्तावित असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती निमात आयोजित औद्योगिक संघटनांच्या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी दिली. उद्योग सचिव पोरवाल यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी निमा येथे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देनाशिकच्या ब्रॅण्डिंगसाठी होणार प्रयत्नसुनील पोरवाल : उद्योजकांच्या बैठकीत दिली माहिती;

सातपूर : शासनाच्या धोरणानुसार राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स झोन प्रस्तावित असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती निमात आयोजित औद्योगिक संघटनांच्या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी दिली.उद्योग सचिव पोरवाल यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी निमा येथे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. दिंडोरी आणि मालेगाव येथील जमिनी अधिग्रहित करून वाटप प्रक्रि येस गती दिली जाईल. सीईटीपी प्रकल्प लवकर उभारण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी उद्योजकांच्या विविध मागण्यांना प्रतिसाद देताना दिले. सध्या बी झोनमध्ये असलेल्या औद्योगिक वसाहतींचा सी झोनमध्ये समावेश करावा. दिंडोरी, गोंदे आणि सिन्नरचा डी प्लस झोनमध्ये समावेश करावा. नाशिक परिसर डिफेन्स आणि एरोस्पेस झोन जाहीर करावा. नाशिकला मोठे उद्योग आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न व्हावेत. राज्य शासनातर्फे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात मेक इन नाशिकच्या ब्रॅण्डिंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. चुंचाळे शिवारातील पांजरापोळची जमीन आणि गोंदे, वाडीवºहे येथील जमीन अधिग्रहित करण्यात यावी, अशा अनेक मागण्या निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्यासह अन्य उद्योजकांनी केल्या.व्यासपीठावर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, मुख्य अभियंता एस. आर. तुपे, अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे, कार्यकारी अभियंता एस. एस. उईके, एस. एस. बडगे, जे. सी. बोरसे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक पी. पी. देशमुख, धुळे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र काकुस्ते, महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर आदी उपस्थित होते. या चर्चेत संजय महाजन, संजीव नारंग, आशिष नहार, प्रदीप पेशकार, राजेंद्र अहिरे, निखिल पांचाळ, रमेश वैश्य, डी. डी. पाटील, मिलिंद देशपांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत बच्छाव यांनी केले. उदय खरोटे यांनी आभार मानले. आयटी पार्कमधील गाळे लवकरच रास्त दरातआयटीच्या इमारतीतील गाळे आणि फ्लॅटेड बिल्डिंगमधील गाळे रास्त दराने भाडेतत्त्वावर नवउद्योजकांना प्राधान्याने उपलब्ध करून दिले जातील. वीजदर कमी करण्यासाठी संघटनांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.मेक इन नाशिक हा उपक्र म मेक इन इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात येणार असून, त्यात नाशिकच्या ब्रॅण्डिंगसाठी वाव दिला जाईल, असे आश्वासन एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सुरवाडे यांनी यावेळी दिले.