शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत पाच दिवस लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:24 IST

इगतपुरी : शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने शहर पाच दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. ...

इगतपुरी : शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने शहर पाच दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.शहरात गेल्या तीन दिवसांपासुन करोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची गंभीरता लक्षात घेत काल तहसील कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. कोरोनाला आळा बसावा म्हणुन इगतपुरी शहर शनिवार दि. २० जुनपासुन पाच दिवस कडकडीत बंद ठेवणार असल्याचा निर्णय नगराध्यक्ष संजय इंदूलकर यांनी या बैठकीत सांगितला.दररोज कोरोना पॉझिटीव्ह रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन शहरातील कोरोनाचे आज एकाच कुटूंबातील दोन रु ग्ण बाधीत मिळाले असून त्यात एक चार वर्षाचा मुलगा आहे. शहरात रु ग्णांची संख्या १६ तर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २६ झाली आहे. कोरोना रु ग्ण बाधीत असलेला भाग नगरपरिषदेने सील केला आहे. वाढत चाललेली रु ग्ण संख्या पाहुन यावर उपाय म्हणुन शहर पाच दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नगराध्यक्ष संजय इंदुलकर, प्रभारी नगराध्यक्ष नईम खान यांनी घेतला आहे. पाच दिवसाच्या बंद काळात मेडीकला सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.या बैठकीस मुख्याधिकारी निर्मला गायकवाड- पेखळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, नगरसेवक उमेश कस्तुरे, नगरसेविका सिमा जाधव, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डॉ. प्रदीप बागल, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक