शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पाच मतदारसंघ अजूनही रेडझोनमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:48 IST

राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेचा गुरुवारी (दि.१३) अखेरचा दिवस असून, अजूनही पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्यची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देआज अखेरचा दिवस : तीन लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

नाशिक : राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेचा गुरुवारी (दि.१३) अखेरचा दिवस असून, अजूनही पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्यची बाब समोर आली आहे. जिल्ह्णातील पडताळणीची एकूण टक्केवारी ९१ टक्के असली तरी सातत्याने टक्केवारी कमी असणाऱ्या मतदारसंघातील टक्केवारी अपेक्षित कामे होऊ शकलेली नाहीत.जिल्ह्णातील १५ मतदारसंघांत ४५ लाख ६२ हजार ५७१ मतदारांची पडताळणी करण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखेने हातात घेतले होते.गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या पडताळणी कार्यक्रमाची मुदत २० डिसेंबर २०१९ पर्यंत होती. परंतु अपेक्षित कामे होऊ न शकल्याने मतदार कर्मचाऱ्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. सदर मुदत एका दिवसात संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी म्हणजे बुधवार (दि.१२) रोजी पडताळणी कामाची माहिती घेतली असता. जिल्ह्णात ९१ टक्के पडताळणीचे काम झाल्याचे दिसून आले. परंतु नाशिक पूर्व, देवळाली, कळवण, मालेगाव मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ८४ ते ९० टक्के दरम्यानच राहिल्याने हे पाचही मतदारसंघ रेडझोनमध्ये आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांत काम करणाºया बीएलओंच्या कामाचे मूल्यमापन होण्याची दाट शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात मतदार पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्णात नोव्हेंबरपासून पडताळणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र या कामाला अपेक्षित गती मिळालेली नव्हती. निवडणूक शाखेने बीएलओ कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कामाची गती वाढली. सोमवारपर्यंत ८४ टक्के असलेले काम गुरुवारी ९१ टक्केपर्यंत पोहचले, मात्र अजूनही तीन लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान निवडणूक कर्मचाºयांपुढे आहे.१८१ स्थलांतरितांपैकी १२ मतदार मयतनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या मतदार पडताळणीच्या कार्यक्रमात मतदारांची माहिती भरून घेताना १८१ मतदारांनी जिल्ह्यातून स्थलांतर केल्याची बाब समोर आलेली आहे. अनेकविध कारणांनी स्थलांतरित करण्यात आलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत तर गेल्या तीन महिन्यांत १२ मतदारांचा मृत्यू झाल्याचीही नोंद मतदार कर्मचाºयांकडे झाली आहे. सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक नवमतदारांचीदेखील नोंदणी या उपक्रमातून झाली आहे.मतदारसंघनिहाय पडताळणीची टक्केवारीनिफाड : ९७.१५दिंडोरी : ९४.९२चांदवड : ९४.६८इगतपुरी : ९४.५०सिन्नर : ९४.२९नांदगाव : ९३.४४नाशिक मध्य : ९२.५९मालेगाव : ९१.४३मालेगाव बाह्य : ९१.४३बागलाण : ९१.१२येवला : ९१.०४नाशिक पूर्व : ९०.७९देवळाली : ९०.४७कळवण : ९०.२७मालेगाव मध्य : ८५.४४नाशिक पश्चिम : ८४.३०

टॅग्स :Electionनिवडणूक