शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असलेले जिल्ह्यातील पहिले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:30 IST

संजय दुनबळे । दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ ...

ठळक मुद्देगरीब विद्यार्थ्यांच्या दारात थांबते शाळेची बस

संजय दुनबळे ।दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी येथील सरपंच प्रयत्नशील असून, वेगवेगळ्या योजनांचा गावाच्या विकासासाठी वापर केल्याने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावात मिळत आहेत. येथील सरपंच नरेंद्र जाधव यांच्या नियोजपूर्वक आणि पारदर्शी कारभारातूनच हे शक्य झाले आहे. शासकीय योजना सर्व ठिकाणी सारख्याच असतात त्यांची जर प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर प्रत्येक गावात हे शक्य आहे. सरपंच नरेंद्र जाधव यांना यावर्षीचा राज्यस्तरीय लोकमत सरपंच आॅफ दि इयर पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...आपल्या ग्रामपंचायतीने कोणती विशेष कामे केली आहेत ?जाधव - दिंडोरी तालुक्यातील अवनखेड सारख्या २८०० लोकवस्तीच्या छोट्याशा गावात आम्ही प्रथम मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला. पूर्वी गावात रस्तेही चांगले नव्हते. दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आज गावात सर्वत्र सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असून अंतर्गत रस्ते सीमेंट कॉँक्रीटचे असणारी तालुक्यातील आमची पहिली ग्रामपंचायत आहे. पूर्वी पाण्याची एकाच ठिकाणी सोय होती. महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत होती. ग्रामपंचायतीचे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. आज गावातील प्रत्येक घरासमोर पाणीपुरवठा योजनेचा नळ आहे. इतकेच नव्हे ग्रामपंचायतीने प्रत्येक घरासमोर एक छोटी मोरी बांधून दिली असून, महिलांची धुणे-भांड्याची सोय तेथेच करून दिली आहे. गावात सर्वत्र भूमिगत गटारी बांधण्यात आल्या असून, त्यातून वाहणारे सांडपाणी शोषखड्ड्यांमध्ये जिरवले आहे. त्यामुळे गावात कोठेही रस्त्यांवर सांडपाणी वाहताना दिसत नाही. यामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे.प्रश्न - ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या ?जाधव - अवनखेड गाव परिसरात विविध कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना सुरुवातीला कर आकारणी खूपच कमी होती. त्यात सुधारणा करून आता शासनाच्या नियमाप्रमाणे कंपन्यांकडून कर आकारणी केली जाते. प्रसंगी कंपन्यांवर जप्तीची कारवाई करून सक्तीने कर वसुली केली जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. त्यामाध्यमातून गावात विकासकामे करण्यास मदत होते.प्रश्न - राज्यस्तरीय पुरस्काराबाबत काय सांगाल?जाधव - २००५ साली मी गावचा सरपंच झालो. ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतल्यानंतर मी पैसा खाणार नाही आणि खाऊ देणार नाही हे सूत्र अंगीकारले आहे. यामुळे गेल्या १५ वर्षांत मी प्रसिद्धीसाठी एकही पुरवणी कुठल्या वर्तमानपत्राला दिलेली नाही. असे असतानाही ‘लोकमत’ सारख्या मोठ्या दैनिकाने माझ्या कार्याची दखल घेऊन मला राज्यस्तरावर सरपंच आॅफ दि इयर पुरस्कार देऊन माझा सन्मान केला, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे.गावात प्राथमिक शाळेची इमारत बांधली आहे. इंग्लिश मीडियमसारखी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी ही इमारत असून, सीएसआर फंडातून शाळेसाठी एक बस घेतली आहे. श्रीमंतांप्रमाणेच आज गरीब विद्यार्थ्यांच्या दारातही शाळेची बस उभी राहाते. यामुळे दूरवरून शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. बस ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविली जात असल्यामुळे या विद्यार्थ्यांकडून अल्प फी घेतली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही परवडते. पूर्वी ३ ते ४ कि.मी.वरून विद्यार्थ्यांना पायी चालत शाळेत यावे लागत होते.

टॅग्स :interviewमुलाखत