नाशिक : दरवर्षी महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जात असली तरी यंदा मात्र वेगळी वाट चोखाळत प्रथमच बांबंूची लागवड करण्यात आली आहे. गोदावरी, नासर्डीसह अन्य नद्यांच्या परिसरात तब्बल २८ हजार बांबू लावण्यात आले आहेत. त्यामुळे जमिनीची धूप थांबण्याबरोबर भविष्यात उत्पन्नदेखील मिळू शकते.महापालिकेच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवड केली जाते. साधारणत: पंचवीस ते पन्नास हजार रोपे लावली जातात. अलीकडे राज्य शासनाच्या वतीने वनमहोत्सव राबविताना सर्व शासकीय- निमशासकीय संस्थांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. यंदा राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरविले होते. त्यात नाशिक महापालिकेला ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १ ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या या वनमहोत्सवात नाशिक महापालिकेने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ५७ हजार ८७४ वृक्षांची लागवड केली आहे. परंतु हे करताना महापालिकेने यंदा बांबू रोपांचीदेखील लागवड केली आहे.शहरातून गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी या नद्या वाहतात आणि पावसाळ्यात त्यांना पूर येतोे त्यामुळे नदीकाठचा मातीचा भाग मोठ्या प्रमाणात खचतो. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने धूप थांबविण्यासाठी प्रथमच बांबूचा वापर करण्यात आला आहे.
शहरात प्रथमच २८ हजार बांबूंची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:57 IST
दरवर्षी महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जात असली तरी यंदा मात्र वेगळी वाट चोखाळत प्रथमच बांबंूची लागवड करण्यात आली आहे. गोदावरी, नासर्डीसह अन्य नद्यांच्या परिसरात तब्बल २८ हजार बांबू लावण्यात आले आहेत. त्यामुळे जमिनीची धूप थांबण्याबरोबर भविष्यात उत्पन्नदेखील मिळू शकते.
शहरात प्रथमच २८ हजार बांबूंची लागवड
ठळक मुद्देपर्यावरण : नदीकिनारी ५० किमी क्षेत्रात फुलणार वन