शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भजन स्पर्धेत एकलहरे महिला संघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:49 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या संघाने, तर पुरु ष गटात नेहरूनगरच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले.

सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या संघाने, तर पुरु ष गटात नेहरूनगरच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले.महिला गटाच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देवळाली कामगार कल्याण केंद्र तर तृतीय क्र मांक ललित कला भवन सिडको केंद्राच्या संघाने पटकावला. तर उत्कृष्ट गायक प्रथम स्मिता जोशी, द्वितीय भावना शिरोडे, तृतीय क्र मांक मनीषा जोशी यांनी मिळविला. उत्कृष्ट पखवाज व तबला वादक म्हणून प्रथम वैभव काळे, द्वितीय हर्षल खैरनार, तृतीय क्र मांक नीलेश तेलोरे यांनी पटकावला. उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथम गायत्री मांडे, द्वितीय उद्धव जोशी, तृतीय क्र मांक साहेबराव गोसावी यांनी तर उत्कृष्ट तालसंघ प्रथम कामगार कल्याण केंद्र ओझर, द्वितीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र गांधीनगर, तृतीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र सिडको यांनी यांनी पटकावला.पुरुष गटाच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देवळाली कामगार कल्याण केंद्राने पटकावला. तर उत्कृष्ट गायक प्रथम संदीप वारुंगसे, द्वितीय बाबूलाल पवार, तृतीय क्र मांक भारत मांडे यांनी मिळविला. उत्कृष्ट पखवाज व तबलावादक म्हणून प्रथम रघुनाथ रोटे, द्वितीय अक्षय क्षीरस्कर, तृतीय क्र मांक लक्ष्मण दिवटे यांनी पटकावला. उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथम संजय वाजे, द्वितीय भगवान लांबे, तृतीय क्र मांक अर्जुन घोटेकर यांनी तर उत्कृष्ट तालसंघ प्रथम कामगार कल्याण केंद्र देवळाली गाव, द्वितीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र सिडको, तृतीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र सातपूर यांनी पटकावला. पारितोषिक वितरण समारंभास प्रा. अविराज तायडे, जगदीश गोडसे, राहुल पगार, अखिल अण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक