ओझर : यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाने येथील मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडले आहेत.मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव, ओझर, खंडेराव मंदिरासमोर व दहावा मैल येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ओझर येथे दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यातच गडाख कॉर्नर येथे महामार्गाला लागण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते, तर खंडेराव मंदिरापासून ते जुन्या गायखे पेट्रोलपंपापर्यंत दोन्ही बाजूस सर्व्हिस रोडचा वापर सध्या सुरू आहे.महामार्गावरील मुख्य सहापदरी रस्त्याला लागताना घ्यावा लागणाऱ्या वळणावर मोठे खड्डे पडल्याने गाडी चालविताना अवजड वाहनधारकांच्या नाकीनव येत आहे. अशातच वळणावर अपघात होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सकाळी सात वाजताव दुपारी तीन वाजता एचएएल कंपनीच्या कामगारांच्या वाहनांची एकच गर्दी होत असल्याने प्रत्येक वाहनधारकाला खड्डे चुकविताना कसरत करावी लागत आहे. यावर लवकर उपाययोजना हवी अशी अपेक्षा वाहनधारकांनी केली आहे.
पहिल्या पावसात महामार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:38 IST
ओझर : यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाने येथील मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडले आहेत.
पहिल्या पावसात महामार्ग खड्ड्यात
ठळक मुद्देअवजड वाहनधारकांच्या नाकीनव येत आहे.