शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पहिले ओव्हरॉल्ड सुखोई वायुसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:15 IST

भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभाल विभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेले प्रथम सुखोई ३० एमके आय एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी) शुक्रवारी (दि. २६) वायुसेनेला हस्तांतरित केले.

ठळक मुद्दे११ बीआरडीचे यशओझर येथे दिमाखदार सोहळ्यात हस्तांतरण

नाशिक : भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभाल विभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेले प्रथम सुखोई ३० एमके आय एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी) शुक्रवारी (दि. २६) वायुसेनेला हस्तांतरित केले. ११ बीआरडीला या विमानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १७ ते १८ महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर उर्वरित दोन महिन्यांत यशस्वीरीत्या चाचणी घेऊन हे विमान भारतीय वायुसेनेला सुुपुर्द करण्यात आले आहे.ओझर ११ बीआरडीच्या इतिहासात २६ आॅक्टोबरचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. येथे संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणेद्वारे सुखोई-३० एमकेआय संपूर्ण ओव्हरॉल्ड करून ११ बीआरडीने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली असून, शुक्रवारी ओझर येथे औपचारिक सोहळ्याच्या माध्यमातून हे विमान भारतीय वायुसेनेच्या आॅपरेशनल स्वाकडनला सुपुर्द करण्यात आले आहे.यावेळी एअर कमोडोर समीर बोराडे यांच्यासह वायुसेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयासह नागपूर व दक्षिण पश्चिम विभाग मुख्यालय गांधीनगर येथील वरिष्ठ अधिकारी तसेच एचएएलचे वरिष्ठ अधिकारी, डीआरडीओ, डीजीएक्यूएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संपूर्ण ओव्हरॉल्ड सुखोई-३० एमकेआय विमानामुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढली असून, फेब्रुवारी महिन्यात आणखी एक विमान वायुसेनेला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दिली आहे.५० टक्के मिग २९ चे अद्यावतीकरणभारतीय वायुसेनेचे मुख्य देखभाल दुरुस्ती केंद्रांपैकी ११ बीआरडी एक असून, येथे मिग-२९, सुखोई-३० एमकेआय, एसयू-७, मिग-२१ व मिग-२८, मिग-२३ सारख्या लढाऊ विमानांची देखभाल व दुरुस्तीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. १९८८ मध्ये प्रथम मिग-२३ विमानांची मध्यम व किरकोळ स्वरूपाची देखभाल दुरुस्ती सुरू झाल्यानंतर २४८ मिग-२३ विमानांची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीचे काम २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आले, तर वर्ष १९९६ पासून मिग-२९ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या काम येथे सुरू असून, यातील ५० टक्के विमानांचे अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.निकषांनुसार चाचणी११ बीआरडीमध्ये सुखोई ३० एमकेआयचे संपूर्ण ओव्हरॉल्ड करून२४ एप्रिलला यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष रणभूमीवर अपेक्षित प्रदर्शनाच्या निकषांनुसारही या विमानाची चाचणी घेण्यात आली. सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच हे विमान आॅपरेशनल स्क्वॉर्डनमध्ये सामील करण्यात आल्याचे एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकDefenceसंरक्षण विभाग