शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

सीए फायनलमध्ये गांधार देशपांडे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:17 IST

: सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर झाला

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकमधील एकूण २८ विद्यार्थी सीएच्या दोन्ही ग्रुपमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. सीए फायनल परीक्षेत नाशिकच्या गांधार देशपांडे या विद्यार्थ्यांने ८००पैकी ४६२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर शुभम संघवी याने ४६० व सुरज अय्यर याने ४५० गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. सीएच्या परीक्षेत नाशिकमधून ५० विद्यार्थी पहिला ग्रुप उत्तीर्ण झाले असून, ३६ विद्यार्थी दुसऱ्या ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. भारतात एकूण ३६८ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून यंदा देशभरातील १ लाख ३२ हजार ७ विद्यार्थ्यांनी सनदी लेखापाल होण्यासाठी परीक्षा दिली होती, तर सीपीटी परीक्षेत एकूण ३९ हजार ३६३ विद्यार्थी बसले होते.

 

चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय) संस्थेतर्फे मे, जून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत भारतात एकूण सात हजार ९२८ (२२.९८ टक्के ) विद्यार्थी दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले असून, ५ हजार ७१७ (१३.६२टक्के) विद्यार्थी पहिल्या ग्रुपमध्ये, तर सहा हजार २३४ (१६.२६ टक्के) विद्यार्थी दुसऱ्या ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले असून, नाशिकच्या सीए फायनल परीक्षेत २८ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे, तर कॉमन प्रोफिसिएन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेत नाशिकचे ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी नाशिक ब्रँच आॅफ डब्ल्यूआयआरसी आॅफ आयसीएआयमध्ये शिकत असलेल्या ६० विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थी उल्लेखनीय चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यात चैताली खांडेकर हिने अकाउंट विषयात ६० पैकी ५९ गुण मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. नाशिकमधील विद्यार्थ्यांना सीए असोसिएशन नाशिक ब्रँचचे अध्यक्ष सीए विकास हासे, उपाध्यक्ष मिलन लुणावत, विक्र ांत कुलकर्णी, सचिव रोहन वसंत आंधळे, खजिनदार हर्षल सुराणा आणि विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे, रेखा पटवर्धन, रणधीर गुजराथी यांच्यासह नाशिकमधील वेगवेगळ्या सनदी लेखापालांचे मार्गदर्शन लाभले आहे.