शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवागतांच्या स्वागताविना शाळेचा पहिला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST

सायखेडा : सलग दुसऱ्या वर्षी शाळा बंद असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाची मजा हरवलेली पाहायला मिळाली. दोन वर्षांपासून कोरोनाचे ...

सायखेडा : सलग दुसऱ्या वर्षी शाळा बंद असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाची मजा हरवलेली पाहायला मिळाली. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्यामुळे शाळा बंद झाल्या, ऑनलाइन शिक्षण आले, मुलांनी वर्षभर शाळेचे आवारदेखील पाहिले नाही, सगळेच वर्ग बंद असल्यामुळे मागील वर्षी पहिलीत दाखल झालेल्या मुलांनी शाळादेखील पाहिलेली नाही. केवळ नाव दाखल झाले. पुस्तके मिळाली. ऑनलाइन शिक्षक दिसले. भाषा, इंग्रजी, गणित यासारखे पुस्तके असलेले विषय थोडेफार समजले; पण शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला या विषयांची ओळखदेखील झाली नसल्याने मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास थांबला असल्याचे पालक बोलत आहेत. शाळेचे तोंड पाहिले नाही, तरी मुले दुसरीत गेली, ग्रामीण भागात आई-वडील शेतीकाम, मजुरीत व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना कोणताही अभ्यास घेता येत नाही. केवळ वर्गाने मुले पुढे जातील; पण प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभती मिळाली नाही. शिक्षक आणि शाळा समजले नाही. त्यामुळे त्यांना पहिलीतच दाखल करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. एक महिन्याची उन्हाळी सुटी संपली की, १५ जून रोजी शाळा सुरू होतात.

शाळेचा पाहिला दिवस म्हटला की, मुलांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होत असते. नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन दप्तर, सर्व काही नवीन आणि नवलाई असते, शिक्षकही मोठ्या उत्सहात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करतात, ग्रामीण भागात पहिलीच्या वर्गातील दाखल मुलांना बैलगाडीत बसवून वाजतगाजत शाळेत आणणे, पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प, नवीन पुस्तके, नवीन गणवेश वाटप करून मोठ्याव उत्साहात पहिल्या दिवसाची सुरुवात होते.

---------------------

शाळेचा पहिला दिवस म्हटला की, खूप मजा असायची, नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, सर्व कसे नवनवीन असायचे, दोन वर्षांपासून ही सगळी नवलाई हरवली आहे. केवळ ऑनलाइन शिक्षण घेऊन शालेय जीवन यांत्रिक झाले आहे. शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला या विषयांची प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची गरज असते, ते मोबाइलद्वारे शक्य नाही.

-आर्या कमानकर, विद्यार्थिनी, सायखेडा

-------------------

शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू आहे, शिक्षक ऑनलाइन, ऑफलाइन, गृहभेटी, गल्लीमित्र या विविध संकल्पनांमधून मुलांपर्यंत शैक्षणिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असले तरी विद्यार्थ्यांविना शाळा, हे चित्र पाहवत नाही, नवागतांचे स्वागत करताना जो आनंद राहायचा, तो मिळाला नाही.

-माणिक मुरकुटे, शिक्षक, सायखेडा

---------------------------

माझ्या पाल्याला मागील वर्षी पहिलीत दाखल केले; पण वर्षभर शाळा बंद असल्यामुळे शाळासुद्धा पाहिली नाही. पहिलीत असलेल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण किती समजणार, शिक्षक जरी शिकवत असले तरी खेळकर मुलांना हसतखेळत शिक्षण मिळाले नसल्याने त्यांचा मानसिक, भावनिक विकास झाला नाही. त्यामुळे शासन स्तरावर या मुलांना पुन्हा पहिलीत प्रवेश मिळावा, यासाठी विचार व्हावा.

-संदीप सातपुते, पालक