शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:05 IST

आनंदवली येथील मनपा शाळा क्र. १८ मधून शाळेच्याच शेजारी असलेल्या खासगी शाळेत विद्यार्थी बळजबरीने दाखल करण्याचा प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि राष्टÑसेवा दलाचे कार्यकर्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व शाळेची पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

नाशिक : आनंदवली येथील मनपा शाळा क्र. १८ मधून शाळेच्याच शेजारी असलेल्या खासगी शाळेत विद्यार्थी बळजबरीने दाखल करण्याचा प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि राष्टÑसेवा दलाचे कार्यकर्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व शाळेची पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. या शाळेतील शिक्षकांनी मनपाच्या शाळेत दाखल होण्यासाठी आलेले विद्यार्थी बळजबरी आपल्या शाळेत दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला.  नूतन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, खासगी आणि शासकीय सगळ्याच शाळांना विद्यार्थ्यांची गरज आहे. मात्र ज्या शाळेकडे स्वत:चे मैदान नाही, स्वमालकीची इमारत नाही, ज्या विविध प्रकारे फी आकारून सर्व विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करतात, अशा शाळांनी मनपाच्या शाळांचे विद्यार्थी पळविणे योग्य नसल्याची भावना येथील पालकांनी व्यक्त केली. या शाळेने काही दिवसांपूर्वी परिसरातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शालेय गणवेशांचे वाटप केले. आनंदवली परिसरातील शाळा नं.३३, शाळा नं.७१ व शाळा नं. ९ या तीन शाळा नं.१८ मध्ये विलीन करण्यात आल्या. याच शाळेतून विद्यार्थी ओढून नेण्याचा प्रकार झाला. मनपा शाळांना कुणी वाली नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.मनपा शाळा टिकल्या पाहिजेत, या शाळांमधून विद्यार्थी घडले पाहिजे हा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा उद्देश आहे. त्यासाठी नियमित शाळांना भेटी देणे, शाळांच्या अडचणी जाणून घेणे यावर भर दिला जातो. शुक्रवारी (दि.१५) घडलेला प्रकार चुकीचा आहे. मनपा शिक्षण विभागाने, आयुक्तांनी यात लक्ष घालावे.  - वसंत एकबोटे,  सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाSchoolशाळा