शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

निफाड तालुक्यातील शाळांचा पहिला दिवस ’थंडा थंडा कूल कूल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:00 IST

लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचने वाढल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने शाळेचा पहिला दिवस ‘थंडा थंडा कूल कूल’ गेल्याचे दिसून आले. शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांअभावी शाळांचे प्रांगण सुने सुनेच होते.

लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचने वाढल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने शाळेचा पहिला दिवस ‘थंडा थंडा कूल कूल’ गेल्याचे दिसून आले. शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांअभावी शाळांचे प्रांगण सुने सुनेच होते.निफाड तालुक्यातील शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थी न येता शाळेत किमान एका शिक्षकाने उपस्थित राहावे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना द्यावयाची पाठ्यपुस्तके अद्याप पूर्णत: प्राप्त झालेली नसल्याने ही पुस्तके प्राप्त होताच तातडीने वितरित केली जातील, अशी माहिती निफाड तालुका प्रभारी गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी दिली.शाळा सुरू होणार असल्यातरी शासन निर्णयानुसार विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, असेही तुंगार यांनी सांगितले.----------------------दिंडोरी तालुक्यातीलप्राथमिक शाळाही विद्यार्थ्यांविनादिंडोरी : कोविड १९च्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने फुलणारी शालेय विद्यार्थ्यांची बाग यंदा फुललीच नाही. सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असूनही शांतता होती. दरवर्षी होणारे नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे स्वागताचे कार्यक्र म कुठेही घेण्यात आले नाहीत. प्रशासनाकडून प्राप्त झालेले नवीन पाठ्यपुस्तके घेण्यासाठी पालक तुरळक प्रमाणात शाळांमध्ये उपस्थित होते. शाळेत कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स राखून वितरण करण्यात आले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत होते. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना महत्त्वाच्या कामाशिवाय शाळेत बोलवू नये, असे लेखी आदेश संस्थाचालकांचे दोन दिवस आधीच प्राप्त झाले होते तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना असे कुठलेही स्पष्ट लेखी आदेश देण्यात आलेले नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये द्विधामन:स्थिती होती. अनेक शाळांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आलेली असली तरी जन्माचा दाखला देऊन शाळा प्रवेश निश्चित करणे आवश्यक असतानाही इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांना दाखल करण्यात उदासीनता दिसून आली. काही शिक्षक मात्र दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेताना दिसून आले.---------------------------विद्यार्थ्यांविना शाळेचे अंगण सुने सुनेब्राह्मणगाव : नव्या शैक्षणिक वर्षाला १५जूनपासून प्रारंभ होतो. मात्र, यंदा कोरोनाच्या दहशतीमुळे व लॉकडाऊन सुरू असल्याने शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविनाच सुना सुना गेला. शिक्षकांनी मात्र हजेरी लावली.एरव्ही उन्हाळी सुटी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र कोरोनाच्या धाकाने यंदा एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नाही. तर शासन आदेशामुळे सर्वच शिक्षक आपापल्या वर्गात उपस्थित होते.ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरु वात केली आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर आता प्रत्येक व्यक्ती कामकाजानिमित्त घराबाहेर पडली आहे. मात्र लहान मुलांना सांभाळणे महत्त्वाचे आहे.पालकही जागरूक असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शक्य असेल तेथे शाळास्तरावरून पाठ्यपुस्तके वितरण करत आॅनलाईन शिक्षण देण्यावर भर दिला आहे.--------------------------शाळा उघडल्या; परिसर मात्र सुना सुना...सायखेडा : ‘आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जसा माउली बाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरु वात १५ जूनला होत असते. मात्र, यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले ते विद्यार्थ्यांविना. उन्हाळी सुटीनंतर सुरू होणारी शाळा दरवर्षी १५ जूनला भरत असते. शाळेचा पहिला दिवस हा शिक्षकांच्या धावपळीने व विद्यार्थ्यांचे किलकिलाटाने सुरू होत असतो. उत्सवाच्या तयारीने शालेय परिसर हा सजवण्यात येतो. प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने गावातून नवीन विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते. त्यासाठी सजवलेला रथ ढोल-ताशांचा पथक यांचे विशेष आकर्षक ठरते. मुलांना गावातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात येते. गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळतात. यंदा मात्र सर्वच सोहळ्यावर कोरोनामुळे विरजण पडले आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक साफसफाई तसेच इतर माहितीच्या संकलनासाठी आले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजणारी शाळा शांत भासत होती. जून महिना सुरू झाला की शाळेची ओढ लागते. नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन मित्र, नवीन पुस्तके सर्व काही नवीन अनुभवायला मिळते.यंदा मात्र शाळेची खूप ओढ लागली आहे. पण खबरदारी म्हणून शासनाने शाळा बंद केले असल्याने शाळेत जाता आले नाही. कोरोना लवकर हद्दपार व्हावा आणि आम्हा विद्यार्थ्यांना लवकर शाळेत जायची संधी मिळावी यासाठी देवाकडे साकडे घालत आहोत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी आर्या कमानकर हिने दिली.

टॅग्स :Nashikनाशिक