शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी  हजारो भाविक देवतांच्या चरणी लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:57 IST

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपीठ असलेली  सप्तशृंगी  माता, तसेच भगवान त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मांगल्यासाठी साकडे घातले.

ठळक मुद्देमांगल्यासाठी साकडे : नाशिक, त्र्यंबक, वणीत गर्दी

नाशिक :  नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपीठ असलेली  सप्तशृंगी  माता, तसेच भगवान त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मांगल्यासाठी साकडे घातले.देवाच्या चरणी माथा टेकविण्यासाठी धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक भूमीत परराज्यातील भाविक आवर्जून दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून गुजरात, मुंबईकडील भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी, त्यांचे वास्तव्य असलेली पंचवटी, तसेच रामकुंडाचे धार्मिक महत्त्व, शक्तिपीठ खान्देशची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता यासह नाशिकमधील धार्मिकस्थळांवर भाविक नववर्षाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. शहरातील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, सोमेश्वर, नवश्या गणपती, एकमुखी दत्त या धार्मिक स्थळांवरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. पंचवटीतील सीता गुंफा, तसेच त्रिवेणी संगमावरही भाविकांनी भेट दिली. गोदाकाठी असलेली पुरातन मंदिरे, तसेच नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकनगरीत भाविकांनी देवदर्शन घेत, नव्या वर्षाचा प्रारंभ केला.वणीत भाविकांची रीघमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ७० ते ८० हजार भाविकांनी नववर्षाच्या पहिल्याच  दिवशी  सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला. ३१ डिसेंबरच्या दिवशी मंदिर २४ तास उघडल्यामुळे धुळे, जळगाव, नगर, नाशिक, मुंबई, पनवेल खारघर, पेण, अलिबाग, गुजरात, सुरत, वासदा, नवसारी, राजपिपला, मुहवा या भागातील भाविक रात्रीच सप्तश्रृंगी गडावर दाखल झाले होते.  यावेळी भाविकांच्या गर्दीमुळे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्र्यंबकला गर्दीत वाढभगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ आज दिवसभर सुरूच होता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील हॉटेल, लॉज, तसेच अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले. वाहनतळावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे