शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनाचे मनपाला विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:59 IST

महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनाचे महापालिकेला विस्मरण झाल्याने राष्टÑवादी शहर कॉँग्रेससह चव्हाणप्रेमी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पात साफसफाई करत चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी महापालिकेचाही निषेध करण्यात आला.

नाशिक : महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनाचे महापालिकेला विस्मरण झाल्याने राष्टÑवादी शहर कॉँग्रेससह चव्हाणप्रेमी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पात साफसफाई करत चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी महापालिकेचाही निषेध करण्यात आला.  स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महापालिकेने ‘तारांगण’ प्रकल्प उभारलेला आहे. शनिवारी (दि.२५) यशवंतरावांची पुण्यतिथी होती. परंतु, पुण्यतिथी असूनही तारांगण प्रकल्पात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आढळून आल्याने आणि महापालिकेला पुण्यतिथीचे विस्मरण झाल्याने राष्टÑवादी शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘तारांगण’ प्रकल्पावर जाऊन परिसरात साफसफाई केली आणि तेथील यशवंतरावांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, सरचिटणीस संजय खैरनार, युवक कार्याध्यक्ष अ‍ॅड. चिन्मय गाढे, शंकर मोकळ, अनिल परदेशी, महेश भामरे, सुनील दातिर, चेतन कासव, राहुल पाठक, डॉ. संदीप चव्हाण, सोपान कडलग आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना कटू अनुभव यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी काही चव्हाणप्रेमी तारांगण प्रकल्पावर आले होते यावेळी त्यांनाही पुतळ्याची रंगरंगोटी झालेली नसल्याचे आढळून आले. सदर कार्यकर्ते १२ मार्च रोजी जयंतीदिनीही अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळीही त्यांना अशीच परिस्थिती दिसून आली होती. आता पुण्यतिथीदिनीही महापालिकेकडून साधी साफसफाईही केली न गेल्याने तरुणांनी संताप व्यक्त केला. यापुढे पुतळ्यास रंगरंगोटी करणे जर महापालिका प्रशासनाला परवडणारे नसेल तर आम्ही दर जयंती व स्मृतिदिनी पुतळ्यास रंगरंगोटी करू, असा मानस यावेळी तरु णांनी व्यक्त केला. यावेळी गोरख ढोकने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी भूषण काळे, कमलेश काळे, विक्र म गायधनी, जगदीश आहेर, शारीक शेख, आयुष पाटील आदी उपस्थित होते. प्रशासनाचे स्पष्टीकरणमहापालिकेमार्फत महापुरुषांची जयंती साजरी केली जात असते. पुण्यतिथी दिनी कार्यक्रम घेतले जात नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासकीय सूत्रांनी केले आहे. मात्र, साफसफाईबाबत संबंधित विभागीय अधिकाºयांना विचारणा केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाChief Ministerमुख्यमंत्री