शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

पहिली घंटा वाजली...शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:20 IST

उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीत आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसह नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकमधील विविध शाळांनी वाजतगाजत स्वागत केले. शाळेत येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासोबत वर्ग पताका आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते.

नाशिक : उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीत आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसह नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकमधील विविध शाळांनी वाजतगाजत स्वागत केले. शाळेत येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासोबत वर्ग पताका आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच आपल्या आई-बाबांपासून दूर जाऊन शाळेत येणाºया चिमुकल्यांना शाळा आपलीशी आणि हवीहवीशी वाटावी यासाठी शिक्षकांनी गुलाबपुष्प आणि गोड खाऊ देत प्रवेशोत्सव साजरा करीत विद्यार्थ्यांचा पहिला दिवस खास बनवला.शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षास २०१९-२० सोमवारी (दि.१७) पासून सुरुवात झाली असून नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या ९०, अनुदानित ८१, विनाअनुदानित ३१ प्राथमिक शाळांसह कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य ११९ व जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ३२४ शाळांमध्ये पहिल्या दिवसापासूनच ‘नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत’ असे फलक शाळांबाहेर लावण्यात आले होते.लावून तसेच शाळेचे प्रवेशद्वार रांगोळी व फुलांनी सजवून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नाएसोच्या उंटवाडीसारख्या काही शाळांनी तर चक्क वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर बहुतांश ठिकाणी लेजीम पथक, जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा केली. पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊसोबत मोफत पाठ्यपुस्तक ांचेही वाटप करण्यात आले. नवे शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून समग्र शिक्षा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये ३० जूनपर्यंत प्रवेशोत्सव सुरू राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत आहे. २५ जून रोजी गावात शाळाबाह्य मुलांच्या भेटीचे आयोजन, २५ ते २९ जून रोजी प्रत्यक्ष पालकांच्या गृहभेटी करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी पटनोंदणी पंधरवड्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर केली जाणार आहे.चिमुकल्यांच्या हुंदक्यांनी पालक झाले भावुककुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वर्गात नानाविध खेळण्यांचा पसारा आणि खाऊचीही रेलचेल.. पण तरीही प्रथमच शाळेत आलेल्या चिमुकल्यांना आई-बाबांचे बोट सोडवत नव्हते. पाल्याला सोडण्यासाठी शाळेत आलेले पालक आपल्या चिमुकल्याच्या हुंदक्यांनी भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या पाल्याची समजूत काढताना कसरत करावी लागली. चिमुकल्यांना शिक्षकांच्या हाती सोपवत पालक माघारी फिरत असताना अनेकजण हमसून हमसून रडत होते. एका बाजूला नवे मित्र, नवे शिक्षक, नवा वर्ग मिळण्याच्या आनंद तर दुसºया बाजूला मनात अनामिक भीती असे संमिश्र चित्र सोमवारी वेगवेगळ्या प्राथमिक शाळांच्या प्रांगणात पहायला मिळाले.दीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी जिल्हाभरातील शाळांमध्ये पुन्हा एकदा बालगोपाळांचा किलबिलाट सुरू झाला. महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांना पुष्पगुच्छ देऊन नवगतांचे स्वागत करण्यात आले. तर काही शाळांनी फळा सजवून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गाणी-गोष्टी, विविध खेळ घेण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी