शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील आग संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:58 IST

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले.

कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. शॉटसर्किटचा लावलेला अंदाज संशयास्पद व दोन्ही कार्यालयांना एकाच वेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागते हे संशयास्पद असल्याने या जळीतकांडाची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे.  कोल्हापूर फाटा येथील जलसंपदा विभागाच्या या दोन्ही कार्यालयांना आमदार गावित, गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. मुसळे व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी सोमवारी कार्यालयाची पाहणी केली. महावितरणचे पथक मंगळवारी येऊन पहाणी करणार असून, याबाबत अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  रविवारी पहाटे लागलेली आग संशयास्पद असल्याचे बोलले जात असून या आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक मान्यता आदेश, अभिलेख, गाव नकाशे आदींसह ३०० हून अधिक गठ्ठ्यातील हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. शॉटसर्किटचा लावलेला अंदाज संशयास्पद असल्याने या जळीतकांडाची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन करणार असल्याचे आमदार गावीत यांनी यावेळी सांगितले.  दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या शौचालय व बाथरूम व कार्यालयप्रमुख यांच्या कक्षास आग का लागली नाही ? या ठिकाणी चौकीदार का नव्हते ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, भ्रष्टाचारची चौकशी होण्यासाठी काही समाजसेवकाकडून माहिती अधिकार कायदाअंतर्गत मागणी करण्यात येत असल्यामुळेच कागदपत्र जाळण्याची चर्चा रंगली आहे.  आमदार गावीत यांच्यासमवेत माकप सरचिटणीस मोहन  जाधव, हेमंत पाटील बाळासाहेब गांगुर्डे, टिनू पगार, काशिनाथ गायकवाड , दामू पवार रशीद शेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आगीत पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा या दोन वेगवेगळया उपविभागातील कार्यालयातील फक्त दप्तर असलेल्याच खोल्यांना आग लागली कशी याबाबत शंका व कुशंका निर्माण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही उपविभागाच्या जळालेल्या खोलीमध्ये अंतर अधिक आहे शिवाय दोन्ही उपविभागाच्या कार्यालयामध्ये शौचालये असून फक्त कागदपत्राच्या खोलीला आग लागली दोन्ही प्रमुखांच्या कक्षाला आग लागली नाही.

टॅग्स :Fairजत्राJ.P. Gavitजे.पी. गावित