शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST

सिन्नर: मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकल्पात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ऑईलच्या ड्रमसह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अभिमन्यू राठोड यांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देनुकसान: सुदैवाने जीवितहानी नाही

सिन्नर: मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकल्पात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ऑईलच्या ड्रमसह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अभिमन्यू राठोड यांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.आगीने धुराचे लोट निघू लागल्यानंतर कामगारांसह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. प्रकल्पातील दोन अग्निशमन बंब तातडीने हजर झाले. आग भडकू लागल्याने मदतीसाठी नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनाही बोलावण्यात आले. सुरक्षा रक्षक, कारखान्यातील कामगारही मदतीला धावले. सायंकाळी सात वाजता आग आटोक्यात आली.या आगीत प्रकल्पात असलेले जुने ऑईलचे ड्रम, इलेक्ट्रिक केबल, रंगाचे डबे जळून खाक झाले. कामगार मदतीला धावल्यामुळे ऑफिसच्या दिशेने येणारी आग विझवण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी कंपनीचे पथक येणार असून त्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकेल.फोटो ओळी- सिन्नर येथील इंडियाबुल्स प्रकल्पात लागलेली आग.

टॅग्स :MIDCएमआयडीसीFairजत्रा