शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरांना आग लावणे महागात पडणार

By श्याम बागुल | Updated: December 6, 2018 16:11 IST

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चाºयाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे.

नाशिक : शिकार व जंगल संपदा नष्ट करण्याच्या दृष्टीने आदिवासी भागात डोंगर, टेकड्यांना आगी लावण्याचे सातत्याने होणारे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, अशी आग लावणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी वन अधिका-यांना दिले आहेत.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चा-याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मात्र वन खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील चारा पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. डोंगर, टेकड्यांवर पावसाळ्याामुळे उगवलेले गवत आता सुकू लागले असून, शिकाºयांकडून ससा, हरणे, मोर आदी प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीसाठी या डोंगर, टेकड्यांना पेटवून देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच जनावरांसाठी उपयुक्त ठरणारा चारादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. सदरचा प्रकार रात्रीच्या वेळीच घडत असून, त्यामुळे आग लावणा-यांचा शोध घेणे मुश्कील होत आहे. जिल्ह्यातील पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी या भागातच प्रामुख्याने अशाप्रकारे आगी लावण्याचा प्रकार घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी वन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन डोंगराना आगी लावणा-यांचा शोध घेण्याचा व त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आग लावणा-यांच्या शोधासाठी पथके स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :fireआगNashikनाशिक