शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजारात आगीच्या घटना

By admin | Updated: January 11, 2017 00:19 IST

दहा बंब : गॅसकटरच्या वापरामुळे निमंत्रण; जीवित, वित्तहानी टळली

सिडको : मागील तीन दिवसांपासून भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भंगारमालाचा व पत्र्यांचा खच पडलेला आहे. या खचमधून वस्तू काढताना गॅसकटरच्या साहाय्याने कापल्या जात आहेत. त्यामुळे ठिणग्या उडून प्लॅस्टिक व लाकडी फळ्यांनी पेट घेतल्याने आग लागली. दीड तासातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. अंबड-सातपूर लिंकरोडवर महापालिकेच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटविले जात आहे. सुमारे साडेचारशेहून अधिक भंगारमालाची गुदामे जमीनदोस्त करण्यात आल्याने संपूर्ण भंगारबाजार नष्ट झाला आहे. यामुळे सर्वत्र प्लॅस्टिक, पत्रे, लोखंडी गज, लाकडी फळ्यांचा खच पडला असून, या खचमधून व्यावसायिकांनी तातडीने वस्तू घेऊन जाव्यात, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. पत्त्यांच्या इमल्याप्रमाणे कोसळलेल्या भंगार मालाच्या गुदामांमध्ये दबलेल्या वस्तूंची शोधाशोध सुरू असून, यासाठी गॅस कटरमार्फत तुटलेले गज व शेडचे पत्रे कापले जात आहे. व्यावसायिकांकडून यासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. यामुळे ठिणग्या पडून आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अद्याप तीन वेळा भंगार बाजार भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. सकाळी विराटनगर व दुपारी १२ वाजेनंतर अजमेरी चौकामध्ये दोन ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू व लाकडी फळ्यांनी पेट घेतला होता. आगीवर तत्काळ पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली गेली आहे. आग अचानकपणे लागली की लावण्यात आली याबाबत सत्यता अग्निशामक दलाकडून तपासली जात आहे. (वार्ताहर)