येवला : शहराच्या मध्यवस्तीत बालाजी गल्ली परिसरातील राहत्या दुमजली इमारतीला बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागून अवघा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत तीन लाख ८५ हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. परंतु देवाजवळ लावलेल्या दिव्याच्या वातीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.बालाजी गल्लीत येवला मर्चण्ट बँकेसमोरील प्रमोद विष्णुपंत जोशी गुरु यांच्या दुमजली इमारतीला बुधवारी सकाळी ६ वाजता आग लागली. जोशी गुरु हे सकाळी देवाजवळ दिवा लावून बाहेर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, दिव्यातील पेटती वात उंदराने पळवली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. खिडकीच्या बाहेर आगीचा लोट दिसल्याने आग लागल्याचे लक्षात आले. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रवीण कुक्कर यांनी तत्काळ परिसरातील वीज बंद केली. यावेळी येवला पालिकेचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. (वार्ताहर)
येवल्यात घराला आग
By admin | Updated: March 23, 2016 22:44 IST