शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

फायर एक्स्टिंग्विशर हाताळण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:03 IST

आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना   प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही फायर एक्स्टिंग्विशर हाताळले. 

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग

नाशिक : आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना   प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही फायर एक्स्टिंग्विशर हाताळले.         जिल्हाधिकारी कार्यालयात फायर एक्स्टिंग्विशर बसविण्यात आले आहे. या आवारात जवळपास ५३ विभाग असून, असंख्य कर्मचारी येथे काम करतात. या कार्यालयांमध्ये एक्स्टिंग्विशर बसविण्यात आलेल आहे. आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून फायर एक्स्टिंग्विशर यंत्रणा महत्त्वाची ठरते. अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असणे अपेक्षित असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कर्मचाऱ्यांसाठी आग विझविण्याचे प्रशिक्षण आयेाजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्यासारखी परिस्थिती निर्माण करून  आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने   आग तत्काळ विझविण्यात आली. याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची माहिती देण्यात आली. जॉन भालेकर, मनोज मुनिंद्र कनोजिया भगवान सुकेश्वर पंडित, पराग विकास कुलकर्णी यांच्याकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना यंत्रणा चालविण्याबाबत सजग करण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार उपस्थित जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष यंत्रणा चालविण्यासाठी दहा फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी दाखविलेल्या धाडसाबद्दल कौतुक करण्यात आले. आग लागण्याच्या परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली तर महिलाही यंत्रणा सहज  हाताळू शकतात, याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय