शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुसळगाव वसाहतीत कंपनीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 18:31 IST

सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील अंगद कारखान्याला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली ...

ठळक मुद्देपरिसरात घबराट। आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाची कसरत

सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील अंगद कारखान्याला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. डी-५४ मधील अंगद कारखान्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या कारखान्यात दगडी कोळश्यापासून चारकोल पावडरची निर्मिती करण्यात येते. अचानक लागलेल्या आगीत दगडी कोळश्याचे व चारकोल पावडरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पत्र्याचे शेडही जळून खाक झाले आहे.सुदैवाने कुठलीही जीवत हानी या घटनेत झाली नाही. आगीची माहिती मिळताच माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या बंबासह नगरपालिका, नाशिकरोड व इंडियाबुल्स येथील चार बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता लागलेली आग सायंकाळी साडेपाच वाजता आटोक्यात आली. यावेळी चारकोल पावडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ भेट देऊन पहाणी केली. ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंबाचे फायर आॅफीसर पी. आर. घोलप, पी. के. चौधरी, पी. पी. पाटील, टी. एस. वाखारे, एन. टी. पदीर यांनी परिश्रम घेतले.गुन्हा दाखलअंगद कारखान्याचा मालक हरप्रीतसिंग गोदर व व्यवस्थापक नीलेश सदगुरु या दोघांविरोधात पोलीस नाईक प्रवीण मासोळे यांनी फिर्याद दिली. लाकडी कोळशापासून पावडर तयार करीत असतांना आगीपासून जीवित व व्यक्तीगत सुरक्षा याची योग्य ती खबरदारी न घेता सुरक्षा धोक्यात आणली, आजूबाजूच्या कारखान्यांची सुरक्षा धोक्यात आणली म्हणून कंपनी मालक व व्यवस्थापकाविरोधात एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातfireआग