नाशिक : पंचवटी परिसरातील टकलेनगर भागात असलेल्या एका व्यावसायिक संकुलातील तळमजल्यात असलेल्या दंत दवाखान्यासाठी लागणारे साहित्यविक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी, कोणार्कनगर भागातील अग्नीशमन केंद्रांवरुन जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.मुंबई-आग्रा महामार्गावरील हिरे महाविद्यालयासमोर असलेल्या 'गोदावरी चेंबर' या व्यापारी संकुलाच्या तळमजल्यात खुश डेन्ट-डेन्टल सीस्टम नावाच्या दुकानाला अचानकपणे आग लागली. या दुकानातून दाताच्या दवाखान्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य विक्री केले जाते. घटनेची माहिती अग्निशमन दलाला परिसरातील नागरिकांनी तत्काळ कळविली. माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पंचवटी उपकेंद्राचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवीण्यास सुरुवात केली. तसेच अतिरिक्त मदत म्हणून कोणार्कनगर विभागीय कार्यालयातूनसुध्दा मेगा बाऊजर बंबासह जवानांनी दाखल होत मदतकार्यात सहभाग घेतला. लिडिंग फायरमन विलास डांगळे, संतोष मेंद्रे, उमेश दाते, प्रदीप बोरसे, संदीप जाधव, महेंद्र सोनवणे, बंबचालक मुश्ताक पाटकरी यांनी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. दुकानाच्या वरच्या बाजुस माळ्यावर असलेल्या विविध जुन्या बीलांच्या कागदांचा मोठा गठ्ठा व रद्दीमुळे आगीने अधिक भडका घेतल्याचे अग्नीशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले. आगीचे निश्चित कारण समजु शकले नाही. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.--
टकलेनगरमध्ये दंत साहित्यविक्रीच्या दुकानाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 21:31 IST
अग्नीशमन दलाच्या पंचवटी उपकेंद्राचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवीण्यास सुरुवात केली. तसेच अतिरिक्त मदत म्हणून कोणार्कनगर विभागीय कार्यालयातूनसुध्दा मेगा बाऊजर बंबासह जवानांनी दाखल होत मदतकार्यात सहभाग घेतला.
टकलेनगरमध्ये दंत साहित्यविक्रीच्या दुकानाला भीषण आग
ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाजजवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली