शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या कासवाला बाहेर काढताना ‘अग्निशामक’चा जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:44 IST

विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले.

ठळक मुद्दे कासवाचा मृत्यू सुमारे पाच ते सहा दिवसांपुर्वी झाला कासवाचे वय अधिक होते व सुमारे तीन ते चार किलो वजन

नाशिक : पंचवटी परिसरातील श्रीकृष्णनगरमध्ये शैनेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका जुन्या पडीक विहिरीत अधिवास असलेल्या वयस्कर कासवाचा अक स्मात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत कासवाला विहिरीतून बाहेर काढताना अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन देविदास चंद्रमोरे कठडा कोसळल्याने जखमी झाले.याबाबत अधिक माहिती अशी, विहिरीतून दुर्गंधी परिसरात पसरत असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ रहिवाशांनी सदर बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधितांनी अग्निशामक दलाला घटना कळविली असता अग्निशामक दलाचे कोणार्कनगर येथील विभागीय केंद्रावरू न बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये काही प्रमाणात पाणी होते व काही भागात मलबा पडलेला होता. अग्निशामक दलाचे जवान सुनील पाटील हे दोरखंड लावून विहिरीत उतरले. यावेळी विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले. त्यांच्या हातापायांना किरकोळ दुखापत झाली असून विहिरीत उतरलेले पाटील यांनी तत्काळ मोरे यांनी उचलून शिडीवरुन बाहेर नेले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पाटील यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कासवाला बाहेर आणत वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रविंद्र सोनार यांच्या ताब्यात दिले. कासवाचा मृत्यू सुमारे पाच ते सहा दिवसांपुर्वी झाला असावा, असे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी व शवविच्छेदनानंतर स्पष्ट केले. कासवाचे वय अधिक होते व सुमारे तीन ते चार किलो वजन असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

गोड्या पाण्यातील कासव

उभयचर प्राण्यांपैकी एक म्हणजे कासव. कासवाचे विविध प्रकार आहेत. समुद्री कासव गोड्या पाण्यातील कासव असे. नैसर्गिक जैवसाखळीतील कासव हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्या शरीराचे डोके, मान, धड व शेपूट असे प्रमुख अंग असतात. गोड्या पाण्यातील कासवे विहिर, तलाव, नदी, नाले, ओहोळात अधिवासासाठी असतात. ही कासवे जमिनीवरही सहज राहू शकतात. 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकWaterपाणी