कंधाणे : येत्या मंगळवारी (दि. २९) होत असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांकडून आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. ऐरवी न दिसणारे चेहरे मतदारांच्या भरत भेटीत व्यस्त असून, वडीलधाऱ्या मंडळीच्या चरणांवर लीन होत विजयासाठी मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. प्रचाराला थोडा अवधी शिल्लक असल्याने मतदारांबरोबरच प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळणाºया कार्यकर्त्यांची मिजास ठेवली जात असून, त्यांच्या खाण्यापिण्याची चंगळ होत आहे. कार्यकर्त्यांची चंगळ असली तरी उमेदवारांची मात्र दमछाक होताना दिसत आहे.निवडणुकीतील जयपराजय गावकीच्या राजकारणातील नवीन राजकीय समीकरणे तर उदयास घालणार नाही ना? अशी चर्चा होत आहे. काही ठिकाणी एकेकाळाचे जीवलग मित्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत तर काही ठिकाणी गावकीच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आज एकमेकांच्या गळ्यात गळा घालून प्रचार यंत्रणा राबताना दिसत आहेत. यंदाच्या बहुतांशी लढती नात्यागोत्याभोवती फिरताना दिसत आहे. जिवाभावाचे मित्र, मामा-भाचे, काका-पुतण्या यांच्यात लढती होत आहे. यामुळे आपल्याच हक्कांच्या मतांचे ध्रुवीकरण राजकीय नेत्यांसाठी अग्निदिव्य ठरत आहे. संभाव्य मतांच्या गोळाबेरजेसाठी उमेदवारांना बरोबर कार्यकर्त्यांकडून जिवाचे रान केले जात आहे. निवडणुकीत हायटेक प्रचार यंत्रणा राबविली जात असून, आपल्या राजकीय कार्यकाळातील केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जात आहे. दिवसभराच्या प्रचाराचा शीण घालविण्यासाठी कार्यकर्त्यांना सुख-सुविधा केल्या जात असून, रोज सुग्रास भोजनावळी उठत आहेत.
कार्यकर्त्यांची चंगळ : मतदारांच्या गाठीभेटींना वेग रणधुमाळी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:37 IST
कंधाणे : येत्या मंगळवारी (दि. २९) होत असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांकडून आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
कार्यकर्त्यांची चंगळ : मतदारांच्या गाठीभेटींना वेग रणधुमाळी अंतिम टप्प्यात
ठळक मुद्देकार्यकर्त्यांची चंगळ असली तरी उमेदवारांची मात्र दमछाक जीवलग मित्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले