शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 01:10 IST

लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. 

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी उपाययोजना निष्काळजीपणा करणाऱ्यांवर  कारवाई होणार

नाशिक : लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. पालकमंत्री छगन भुजबवळ यांनी रविवारी दुपारी भुजबळ फार्म येथे कोरेाना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगितले. विनामास्क फिरल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या.गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्ण संख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या १७३१ पर्यंत पोहचली.  मागील पाच दिवसात तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले. लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीत असंख्य लोक विनामास्क फिरत असतात. कोरोनाचे भय बाजूला सारुन बाजारपेठेतही विनामास्क फिरणाऱ्यांनी गर्दी दिसते. मास्ककडे झालेले दुलर्लक्ष आणि त्यामुळेच रुग्न संख्या वाढत असल्याने नाशिककरांना आता मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. विनामास्क आढळल्यास महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ. अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत आदी उपस्थित होते.केवळ १०० व्यक्तींनाच परवानगीलग्न सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी येथून पुढे केवळ १०० व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे. ज्यांचा लग्नसोहळा आहे त्यांना याबाबत पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. गोरजमुहुर्तावर लग्नसमारंभात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन मंडप व लॉन्स मालकांनादेखील याबाबतची समज दिली जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचनापालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी, सर्व आस्थापना, समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.गोरज मुहूर्तावरील लग्नांवर येणार निर्बंधगोरज मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्याला मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अशा मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर आता पोलिसांची नजर राहाणार आहे.  शक्यतो दुपारी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारंभ असा कार्यक्रम मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत करण्याचा सल्लादेखील भुजबळ यांनी नाशिककरांना दिला. लग्न सोहळ्यासाठी यापुढे केवळ शंभर जणांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याChhagan Bhujbalछगन भुजबळ