नाशिक : चौसाळे येथील रहिवासी असलेल्या मिराबाई सावळीराम जोपळे ही महिला शेतात काम करत असताना बिबट्याने चार महिन्यांपुर्वी त्यांच्या हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सुदैवाने या हल्ल्यात त्या बचावल्या. त्यांना वनविभागाकडून शासन नियमानुसार सव्वा लाख रूपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.दिंडोरी तालुक्यातील चौसाळे, उमराळे, परमोरी, लखमापूर, चिंचखेड, पिंपळगावकेतकी, वलखेड आदि कादवा नदी खोऱ्याजवळ असलेल्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर आढळतो. शेतात काम करत असताना अचानकपणे जोपळे यांच्यावर बिबट्याने झडप घातली होती. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर प्रथम वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेला सुमारे चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. जोपळे यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने त्यावेळेस उपचारासाठी व इतर खर्चासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी गावीत, ग्रामसेवक संघटना दिंडोरी तालुका, ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत त्यांना देण्यात आली होती. तसेच वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे यांनी त्यांना शासनामार्फत सव्वा लाखांचा धनादेश प्रदान केला.
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेला अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:18 IST
ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत त्यांना देण्यात आली होती. तसेच वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे यांनी त्यांना शासनामार्फत सव्वा लाखांचा धनादेश प्रदान केला.
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेला अर्थसहाय्य
ठळक मुद्देग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत