खडकी: कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यटन धोरणाला मंत्रालयात मंजुरी मिळाली. यामुळे शेतीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पूर्वीच्या काळात हुरड्याला खूप महत्त्व होते त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कृषी पर्यटन विकासाला या योजनेच्या माध्यमातून विकसित केल्यास शेतकºयांच्या आशा पल्लवित होणार आहेत कारण कृषी पर्यटन धोरण शेतकºयांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारत देश ग्रामीण भागात वसलेला आहे ग्रामीण भागातील लोकांचे प्रथम व्यवसायाचे साधन शेती आहे. या शेतीतून शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच इतरही लोकांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादनात निर्माण निर्मिती करतो. मात्र ही निर्मिती करीत असताना शेती बेभरवशाची मानले जाते. व्यवसायिक शेती म्हणून शेतकरी शेतीकडे पाहिले तर पावसावर आधारित शेती आपल्या देशात आहे. या शेतीला वाव मिळण्यासाठी शेतीवर आधारित शेतमालाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील या उद्योगाच्या उत्पादनाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी कृषी पर्यटन योग्य मार्ग आहे .त्या अनुषंगाने शासनाने चांगली पावले उचलली आहेत. यापूर्वी कृषी पर्यटन धोरणाला उद्योगाचा दर्जा देऊन शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी शेतकºयांच्या उत्पादनाला पूरक उद्योगाचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासाठी शेतातील विकणाºया उत्पादनाची चौकशी करून त्यावर आधारित उद्योगात शोधण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी आधारित व्यवसायाची संशोधन करण्यासाठी धजावले गरजेचे आहे. यातूनच शेतकºयांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. कृषी पर्यटन धोरण विकसित करण्यासाठी ग्रामीण भागातील हुरडा पार्टी या कल्पनेला मूर्त रूप देऊन हा शेतकºयांच्या बाजरी ज्वारी गहू हरभरा मका तुरीच्या ओल्या शेंगा आदी उत्पादनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. व त्यातून मिळणाºया उत्पादनाच्या आर्थिक बाजू मिळेल शेतकरी सक्षम होणार आहे. यासाठी विशेष अनुदान योजना सुरू करणे गरजेचे आहे .शेतकºयांच्या कुटुंबाला किंवा त्याच्या कुटुंबातील रोजगाराला अनुदान देऊन हुरडा पार्टीसाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहित करणे कृषी पर्यटन धोरण यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठे मॉल उभारून तेथे हुरडा पार्टी आयोजित करणे यासाठी चे कार्यक्रम निर्माण करणे त्यातूनच रोजगारही उपलब्ध होणार आहे.
हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:29 IST
खडकी: कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यटन धोरणाला मंत्रालयात मंजुरी मिळाली. यामुळे शेतीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत
ठळक मुद्देकृषी पर्यटन धोरण शेतकºयांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार