शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:09 IST

नाशिक : जिल्ह्यातील दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सदर जवान हे प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले होते.

ठळक मुद्देशासन निर्णय : जिल्ह्यातील सुपुत्रांना मानवंदना

नाशिक : जिल्ह्यातील दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सदर जवान हे प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले होते.

राज्य शासनाने साकोरी झाप, ता. मालेगाव येथील शहीद नायक सचिन विक्रम मोरे यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सचिन मोरे यांच्या पत्नी सारिका मोरे यांच्या नावावर ६० लाख रुपये, तर वीरमाता जिजाबाई विक्रम मोरे व वीरपिता विक्रम मोरे यांच्या नावे प्रत्येकी २० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. २४ जून २०२० रोजी देशांतर्गत सुरक्षेसंबंधी ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेंतर्गत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पूर्व लडाख येथील अतिउच्च भागात कार्यरत असताना सचिन मोरे यांचा शौक नदीत बुडून मृत्यू झाला होता.शासनाने खालप, ता. देवळा येथील हवालदार विजय काशीनाथ निकम यांच्याही वारसांना २५ लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहीद विजय निकम यांच्या पत्नी अर्चना विजय निकम यांना २५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. विजय निकम यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असल्याने केवळ वीरपत्नीलाच अर्थसाहाय्य केले जाणार आहे. दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी देशांतर्गत सुरक्षासंबंधी ऑपरेशन रक्षक मोहिमेंतर्गत जम्मू-काश्मीर येथील नियंत्रण रेषेवरील अतिउच्च ठिकाणी कार्यरत असताना खराब हवामानामुळे विजय निकम यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :GovernmentसरकारSoldierसैनिक