शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पाणी करारासाठी अखेर मनपाकडून कागदपत्रे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:21 IST

गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे.

नाशिक : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे.नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत महापालिकेने जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणीपुरवठ्याची हमी घेतल्यांनतर गेल्या २०११ पासून हा करार रखडला आहे. किकवी धरणच बांधले नसताना त्यामुळे बाधित सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च जलसंपदा विभाग मागत असून, त्यामुळे हा उभय विभागात मतभेद सुरू झाले होते. जलसंपदा विभाग अव्वाच्या सव्वा रक्कम तर मागत आहेच शिवाय पाणीपुरवठ्याचा करारदेखील करीत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे होते. महापालिकेने अनेकदा कराराची कागदपत्रे सादर केली तसेच स्टॅँप पेपर सादर करूनही जलसंपदा विभाग करार करण्यास टाळाटाळ करीत होताच, शिवाय करार केला नाही म्हणून महापालिकेला दीड ते दोन पट जादा दर आकारून देयके पाठविली जात होती.तीन महिन्यांपूूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने करार करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने तशी इच्छाही प्रदर्शित केली होती. मात्र तरीही जलसंपदा विभागाने पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आदेश मानण्यास टाळाटाळ सुरू केली उलट महापालिकेकडेच कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.किकवी धरण न बांधताच महापालिकेकडे बाधित सिंचन क्षेत्राचा पुनर्स्थापना खर्च मागितला जात असून, त्यावर जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी