शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 00:15 IST

नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद‌्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी : परिसरातील पुराचा धोका कमी होणार

नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद‌्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रारंभ झाला. ३.२ किलोमीटर अंतरातील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी या टप्प्यातील पाणी रोखण्यात आले. प्रोजेक्ट गोदा अंतर्गत सध्या विविध कामे सुरू असून त्यात गोदावरी नदीकाठाचे सुशोभिकरण, पायाभूत सुविधा आणि ट्रॅश स्कीमरच्या मदतीने नदीची स्वच्छता करताना होळकर पुलाखाली स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तळ काँक्रिटीकरण हटवण्याबरोबरच गोदापात्रातील गाळदेखील काढण्यात येणार आहे. नऊ कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे.महापालिकेने यापूर्वी गोदावरी नदीवर पूल बांधताना आणि जलवाहिनी नेताना नदीपात्रात कॉफर डॅम (मातीचा बंधारा) बांधला होता. त्यामुळे नदीपात्रात गाळ साचला आहे. गाळ साचल्याने नदीपात्र उथळ झाले आहेत. २००८ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यामागे अनेक कारणांपैकी या परिसरातील गाळ हे देखील कारण होते. परंतु पुरामुळे या परिसरात जलसंपदा विभागाने आखलेली पूररेषा ही आणखीनच अडचणीची ठरली होती. या पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या अंगिकृत संस्थेने ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात नदीपात्रातील गाळ काढण्याचीदेखील शिफारस केली होती. आता हे काम सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ होणार असले तरी पूररेषा कमी होण्यास मदत होणार आहे.नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे नदीपात्र विस्तृत होईल, खोली वाढेल तसेच वहन क्षमतादेखील वाढणार आहे. त्यामुळे परिसरात पुराचा धोका कमी होईल. विशेषत: होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत मॅकेनिकल गेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे गाळ काढलेले पाणी नेमके टप्प्यात येऊन पुराचा धोका कमी होईल, असे स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी सांगितले.स्मार्ट सिटी कंपनीने नदीपात्रातील गाळ काढल्यानंतर तो ठेवण्यासाठी एक जागा निश्चित केली असून आणखी दोन जागादेखील निवडल्या जाणार आहेत. मात्र, शेतीसाठी गाळ उपयुक्त असल्याने तो नेण्याचे आवाहन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका