शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रस्त्यांच्या कॉँक्रीटीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:12 IST

पावसाळ्याच्या तोंडावर वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गटारी आणि जलवाहिन्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे काँक्रिटी-करणाचाही खोळंबा झाला. परिणामी पावसामुळे नागरिकांच्या दारात चिखलाचे साम्राज्य पसरले. नागरिकांमधून ढिसाळ नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आणि गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला अखेर गती मिळाली.

ठळक मुद्देवडाळागाव : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासन हलले; नागरिकांमध्ये समाधान

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गटारी आणि जलवाहिन्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे काँक्रिटी-करणाचाही खोळंबा झाला. परिणामी पावसामुळे नागरिकांच्या दारात चिखलाचे साम्राज्य पसरले. नागरिकांमधून ढिसाळ नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आणि गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला अखेर गती मिळाली.मूलभूत सोयीसुविधांचा नेहमीच बोजवारा ज्या भागात उडालेला दिसतो, त्या वडाळागावातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम मनपाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार महिन्यांपूर्वी हाती घेतले. रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी सरसकट गल्ली-बोळासह अंतर्गत वापराचे रस्ते खोदण्यात आले. परिणामी सध्यस्थितीत गावात रस्ते केवळ नावाला उरले असून, सर्वत्र चिखलामुळे बजबजपुरी निर्माण झाली आहे. रस्ते विकासाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत होता. वडाळा गावातील रस्त्यांची अवस्था मागील चार महिन्यांपासून कायम आहे .वडाळ्यातील सर्वत अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रीटीकरणाचे काम महापालिकेने मंजूर केले हे काम सुरू होण्याअगोदर त्याचे नियोजन अत्यंत ढिसाळ पद्धतीने झाल्यामुळे वडाळा गावातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली आहे परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गावातील मुख्य रस्ताही तातडीने दुरुस्त करण्याचे आश्वासनयाबाबत ‘लोकमत’ने नागरिकांच्या प्रतिक्रि या जाणून घेत विशेष वृत्त बुधवारी (दि.२६) प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत मनपा अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची पाहणी करत ठेकेदाराला काँक्र ीटीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तसेच रेंगाळलेल्या भुयारी गटारीच्या जोडणीची कामे, जलवाहिन्याची दुरु स्ती आदींदेखील प्राधान्याने मार्गी लावण्यचे आदेश दिले गेले. यानंतर राजवाडा, गोपालवाडी, माळीगल्ली, खोडे गल्ली, मनपा शाळा परिसरात अंतर्गत रस्ते काँक्र ीटीकरणाला वेग आला. दोन महिन्यांपूर्वी या भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आलेले होते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. येत्या आठवड्यात गावातील अंतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्णत्वास येणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गावातील मुख्य रस्तादेखील तातडीने दुरु स्त केला जाणार आहे. मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार