शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

...अखेर प्रबुद्धनगरातील शाळेचे कुलूप उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:57 IST

नाशिक : प्रबुद्धनगरातील नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालयाला लावलेले कुलूप अखेर संस्थेच्या सचिवांनी उघडल्याने बुधवारपासून शाळा ...

नाशिक : प्रबुद्धनगरातील नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालयाला लावलेले कुलूप अखेर संस्थेच्या सचिवांनी उघडल्याने बुधवारपासून शाळा नियमित सुरू झाली आहे.सातपूर प्रबुद्धनगरात १९९५ पासून नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालय सुरू आहे. या विद्यालयात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा भरते. मात्र संस्थाचालक आणि शिक्षकांमधील अंतर्गत वादामुळे या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच शाळा भरते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शाळा उघडल्याने तुर्तात तरी वाद बाजूला पडला आहे.या शाळेत प्रबुद्धनगरातील हातमजूर कामगार, कष्टकऱ्यांचीच मुले शिक्षण घेत आहेत. अनुदानित असलेल्या या शाळेत मागील काही दिवसांपासून शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने संस्थाचालकाने शालेय सुटीत शाळा इमारतीला टाळे ठोकले होते. त्यामुळे दोन दिवस विद्यार्थ्यांना बाहेरच रस्त्यावर थांबावे लागले होते. याबाबत शाळेतील शिक्षकांनी महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी महाजन यांची भेट घेऊन संस्था सचिव सखाराम सरकटे यांच्या मनमानी कारभाराबाबत निवेदन दिले. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने बुधवारी सकाळीच संस्थेचे सचिव सखाराम सरकटे यांनी शाळेत येऊन शिक्षकांच्या हवाली कुलपाची चावी सोपविली. त्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान संस्थाचालकांनी शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापकाची नेमणूक केली नसल्याने शालेय दाखले, पोषण आहार, वेतनबिले, शासकीय पत्रव्यवहार करण्यास स्वाक्षरीचे अधिकार नसल्याने नियमित कामकाजात अडचणी येत असल्याची माहिती शिक्षकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.पटसंख्या २०० पर्यंतयेथे २००च्या आसपास पटसंख्या आहे. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद शाळेला मिळतो. परिसरातील गोरगरीब, मोलमजुरी करणारे, कामगार, रोजंदारीवरील कामगारांची मुले या शाळेत शिकतात. शाळा नियमित सुरू झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.संस्थाचालक आणि शिक्षकांमधील वादामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली प्रबुद्धनगरातील शारदा विद्यामंदिर शाळा बुधवारपासून नियमित सुरू झाली आहे. शाळा उघडण्याबाबती स्पष्ट शाश्वती नसल्याने विद्यार्थी संख्येवर याचा परिणाम जाणवला. गुरूवारपासून विद्यार्थी संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी