शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर शहीद अब्दुल हमीद चौकाची उपेक्षा थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:57 IST

जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मागील सहा वर्षांपासून नामफलकाची प्रतीक्षा होती.

नाशिक : जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मागील सहा वर्षांपासून नामफलकाची प्रतीक्षा होती. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली जात असताना मात्र महापालिकेला मुहूर्त मिळत नसल्याने अखेर यावर्षी हेलबावडी परिसरातील सय्यद हमदान शहा समितीने पुढाकार घेत शहिदांच्या नावाने असलेल्या चौकाची उपेक्षा नामफलक उभारून थांबविली.  सहा वर्षांपूर्वी येथील रस्ते विकासकामादरम्यान, महापालिकेचा जुना नामफलक संबंधितांनी काढला; मात्र पुन्हा फलक बसविण्याची तसदीदेखील घेतली गेली नाही. शहरात महापालिकेने सर्वत्र नवीन फलक उभारण्याची मोहीम पार पाडली; मात्र भारतीय सैन्यदलातील शहीद अब्दुल हमीद यांचे नाव ज्या चौकाला दिले गेले आहे, त्या चौकात नामफलक लावून स्मृती जपण्याचा साधा प्रयत्नदेखील महापालिकेने केला नाही, हे विशेष!  सहा वर्षांचा कालावधी उलटूनदेखील महापालिकेला फलक लावण्याचा मुहूर्त मिळत नसल्याने येथील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेत आपापसांत वर्गणी गोळा करून या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचा नामफलक उभारला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर या नव्या फलकाचे अनावरण करण्यात आले.‘लोकमत’च्या पाठपुराव्याने नागरिकांमध्ये जागृतीशहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने ओळखला जाणारा चौक नामफलकविना असल्याने, शहीद चौकाची उपेक्षा होत होती, याबाबत ‘लोकमत’ने मागील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १३ आॅगस्ट रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच २०१६ साली १० सप्टेंबर रोजी अब्दुल हमीद यांच्या स्मृतिदिनी विशेष वृत्त प्रसिद्ध करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सातत्याने लोकमतने याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला असला तरी महापालिक ा प्रशासनाला जाग आली नाही; मात्र नागरिकांमध्ये जनजागृती झाली.१९६५च्या भारत-पाक युद्धात वीरमरण आलेले अब्दुल हमीद यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीरचक्राने सन्मानित केले आहे. अब्दुल हमीद यांनी पळकुट्या पाकिस्तान सैन्याचा पाठलाग करून केवळ ‘गन माउंटेड जीप’च्या सहाय्याने पाकिस्तान सैन्याचे ‘अमेरिकन पॅटर्न टॅँक’ उद्ध्वस्त केले होते. यावेळी एक बॉम्बगोळा त्यांच्या जीपवर आदळल्याने अब्दुल हमीद जखमी झाले होते. १० सप्टेंबर १९६५ साली त्यांना वीरमरण आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक