शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:20 IST

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे मंगळवारी (दि.५) दुपारी श्वानाच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत अडकला होता. वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करत  पाच तासांनंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले.  मात्र अद्यापही बिबट्याची मादी या परिसरात असल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. 

ठळक मुद्देपिंपळगाव भटाटा : पाच तास चालले रेस्क्यू ऑपरेशन

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे मंगळवारी (दि.५) दुपारी श्वानाच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत अडकला होता. वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करत  पाच तासांनंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले.  मात्र अद्यापही बिबट्याची मादी या परिसरात असल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वैतरणा मार्गावरील पिंपळगाव भटाटा हद्दीतील गांगडवाडी येथे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्वानाला भक्ष्य करण्याच्या प्रयत्नात धावणारा बिबट्या थेट गोविंद हिंदोळे या इसमाच्या घरात शिरला होता. हिंदोळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत घराचा दरवाजा लावून घेतल्याने बिबट्या घरातच अडकून पडला होता. श्वान मात्र बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी झाला. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली. वनविभागाला अनेक अडथळे आले. त्यात अंधार पडल्याने अडचणीत भर पडत गेली.   दरम्यान, झोपडीच्या दरवाजालाच पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी झोपडीत फटाके फोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न होत होते. अखेर मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मादीही सोबत असण्याची शक्यता पिंपळगाव भटाटा परिसरात घरात घुसलेल्या दीड ते दोन वर्षांच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले,    परंतु परिसरात मादी असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.   वनविभागाने या भागामध्ये लक्ष केंद्रित करून पुढील संकटांना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात व आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या