शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

अखेर देवीदास पिंगळे यांना जामीन

By admin | Updated: April 6, 2017 01:09 IST

नाशिक : बाजार समितीतील १२८ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सभापती देवीदास पिंगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी जामीन मंजूर केला़

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२८ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी २५ डिसेंबरपासून न्यायालयीन कोठडीत (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह) व सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी बुधवारी (दि़ ५) सशर्त जामीन मंजूर केला़ त्यामध्ये चार महिने नाशिक शहर बंदी व सुनावणी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याच्या अटींचा समावेश आहे़ मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी या जामिनावर सुनावणी झाली़ पिंगळे यांचे वकील अ‍ॅड़ अनिकेत निकम यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पिंगळे हे सराईत गुन्हेगार नसून राजकीय द्वेषापोटी त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे़ या गुन्ह्णात दीड हजार पानी दोषारोपपत्रदेखील दाखल करण्यात आल्याने तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्णात आरोपीला इतके दिवस कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला़ तर सरकारी वकिलांनी पिंगळे यांच्या जामिनास विरोध करून साक्षीदार व कारवाईस दबाव निर्माण होण्याचा युक्तिवाद केला़न्या. मृदुला भाटकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून पिंगळे यांना सशर्त जामीन मंजूर केला़ त्यामध्ये ४० हजार रुपयांचे जामीनदार, चार महिने नाशिक शहर बंदी व खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याच्या अटींचा समावेश आहे़यापूर्वी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना धमकावल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेले अदखलपात्र गुन्हे, अपहाराची मोठी रक्कम, जिल्हा रुग्णालयाने वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा अहवाल तसेच एसीबीकडील पुरावे या आधारावर पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता़ दरम्यान, देवीदास पिंगळे हे २० मार्चपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत़ उच्च न्यायालयाकडून जामिनाची प्रत मिळताच त्यांची कारागृहातून सुटका केली जाणार आहे़ (प्रतिनिधी) काय आहे प्रकरण़़़ च्नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणारे सानुग्रह अनुदान व वेतनातील फरकाची रक्कम सेल्फ बेअरर चेकवर बळजबरीने सह्या घेऊन पेठ नाक्यावरील एनडीसीसी बँकेतून काढून ती एका पदाधिकाऱ्याकडे पोहोचवली जाणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती़ त्यानुसार २५ आॅक्टोबर २०१६ रोजी सापळा रचून सायंकाळी समितीचे कर्मचारी तथा संचालकाचे सचिव विजय निकम, अरविंद जैन (लेखापाल), दिगंबर चिखले (लिपिक) हे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच १५, सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली़ या तिघांवरही म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़ या तिघांना प्रथम पोलीस व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती़