शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांची अंतिम यादी ३ एप्रिल रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:52 IST

सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नवीन कायदा केला असून, यापुढे ज्या बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येईल त्यांची निवडणूक नवीन कायद्यानुसार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन नावावर असलेल्या प्रत्येक शेतक-याला नवीन कायद्यानुसार

ठळक मुद्देमे महिन्यात निवडणूक : जात वैधतेचे उमेदवारांपुढे संकट

नाशिक : नवीन सहकार कायद्यानुसार होऊ घातलेल्या जिल्ह्यातील नामपूर व सटाणा बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी येत्या ३ एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असून, तसे झाल्यास मे महिन्याच्या अखेरीस या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी राखीव गटातून उमेदवारी करणाऱ्यांना नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले असले तरी, समाजकल्याण खात्याने जोपर्यंत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्याचा पुरावा दाखल होत नाही तोपर्यंत इच्छुकांची जात वैधता न करण्याचा निर्णय घेतल्याने वैधता मिळविण्यासाठी ऐनवेळी उमेदवारांची धावाधाव होणार आहे.सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नवीन कायदा केला असून, यापुढे ज्या बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येईल त्यांची निवडणूक नवीन कायद्यानुसार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन नावावर असलेल्या प्रत्येक शेतक-याला नवीन कायद्यानुसार बाजार समितीचे मतदार ठरविण्यात आल्याने नामपूर व सटाणा या दोन बाजार समितींच्या अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सूत्रांच्या मते मतदार याद्या तयार झाल्या असून, त्यावर अखेरचा हात फिरविला जात आहे. येत्या ३ एप्रिल रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणत: २० दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जातो व या निवडणूक कार्यक्रमासाठी ३५ दिवसांची मुदत असते. त्यामुळे एप्रिल महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यास साधारणत: मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. तशी घोषणा सहकार प्राधिकरण करणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे अंतिम मतदार यादीकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक