शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी स्फुक्टोचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:40 IST

शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी सांगितले. 

ठळक मुद्दे वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन राज्यातील 12 हजार रिक्त जागा भरण्याची मागणी

नाशिक : शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी सांगितले. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघातर्फे  सुरू असलेले कामबंद आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच असून, वारंवार आंदोलने करूनही सरकार प्राध्यापकांना दाद देत नसल्याने यावेळी मागण्या मान्य करून त्याविषयी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय अध्यापक संघटनेने घेतला आहे. याचदरम्यान, ओझर येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची नाशिक जिल्हा स्फूक्टोचे अध्यक्ष डॉ. सतीश ठाकरे, प्रा. विजय काकुळते, सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार, प्रा. जे. एस. पाटील, डॉ. राजू सांगळे आदी प्रतिनिधींनी भेट घेऊन प्राध्यापकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. प्राध्यापक महासंघातर्फे  मागील दोन महिन्यांत पाच वेळा राज्यस्तरीय आंदोलने करून मागण्या प्रलंबितच आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील २५ हजारांहून अधिक प्राध्यापक पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन करीत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकProfessorप्राध्यापकagitationआंदोलन