शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून...  खंडेराव  मंदिरांमध्ये चंपाषष्ठी  उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:32 IST

नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. पांढरे घोडे, भाविकांच्या डोक्यावर पिवळे फेटे, वाद्यांची सुरेल साथ, जागोजागी भाविकांकडून फुले, बेलभंडाºयाची होत असलेली उधळण, सदानंदाचा ...

ठळक मुद्देगोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून जल्लोषात मिरवणूक प्रवेशद्वारावर आकर्षक रोषणाई रहाडी जागरणाच्या कार्यक्रम

नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. पांढरे घोडे, भाविकांच्या डोक्यावर पिवळे फेटे, वाद्यांची सुरेल साथ, जागोजागी भाविकांकडून फुले, बेलभंडाºयाची होत असलेली उधळण, सदानंदाचा जयघोष यामुळे वातावरण भारून गेले होते. मंदिरांच्या गाभाºयात आणि प्रवेशद्वारावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळी काकडआरती, अभिषेक, पूजा, आरती, नैवेद्य, महाप्रसाद आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. तत्पूर्वी जागरण गोंधळाचा कार्यक्रमही पार पडला. कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी विक्रमी संख्येने खंडेराव मंदिरात हजेरी लावली होती. सकाळी गंगाघाटावरील खंडेरावकुंड ते शक्तीनगर, हिरावाडीपर्यंत खंडेरायांची छोटी मूर्ती, मुखवटा, पादुका यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मिरवणूक व रहाडी जागरणाच्या कार्यक्रमसह उदय गांगुर्डे यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गोरक्षनगरला खंडेरायाचा जयघोष पेठरोडवरील गोरक्षनगर येथील खंडेराव महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पंचोपचार पूजन, अभिषेक पूजन व सत्यनारायण पूजन करण्यात आले. दुपारी खंडेराव महाराजांची परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी गोरक्षनगर कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाचे प्रवीण जाधव, दत्तू राऊत, अपूर्व शास्त्री, सचिन साळुंके, प्रशांत कुलकर्णी, शिवाजी शिंदे, किशोर गावंडे, श्रीराम गावंडे, निखिल सहाने आदी उपस्थित होते.

टॅग्स :godavariगोदावरीFairजत्रा