नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एरील एम्प्लॉईज को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनसह तिघांवर अंबड पोलीस ठाण्यात आठ लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुनील रामदास आढाव (रा़ रामलीला, श्रीगणेश सोसायटी, हनुमाननगर, पंचवटी) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एरील क्रेडिट सोसायटीचे चेअरमन मनोज अशोक हिरे, व्हाईस चेअरमन एस़ ए़ मोरे व प्रवीण खैरनार या तिघांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ७ लाख ६५ हजार रुपयांचा अपहार केला़ याप्रकरणी या तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
एरील क्रेडिट सोसायटीच्या संचालकांवर अपहाराचा गुन्हा दाखल
By admin | Updated: August 10, 2016 01:18 IST